एक्स्प्लोर

Donald Trump: फेसबुक, युट्यूबवर डोनाल्ड ट्रम्प यांची दोन वर्षांनी वापसी; बंदी उठल्यानंतर समर्थकांना म्हणाले, I Am Back

Donald Trump Post on Youtube and Facebook: 76 वर्षीय रिपब्लिकन नेता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. ट्रम्प यांचे फेसबुकवर तब्बल 34 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर त्यांचे 2.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Donald Trump post on Youtube and Facebook: अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन वर्षांनंतर शुक्रवारी (17 मार्च) फेसबुक (Facebook) आणि यूट्यूबवर (YouTube) पुनरागमन केलं आहे. त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यूएस कॅपिटल हिंसाचारानंतर (US Capitol Violence) डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली होती. अखेर शुक्रवारी त्यांच्या खात्यावरील बंदी उठवण्यात आली. बंदी उठवताच ट्रम्प फेसबुक आणि यूट्यूब अकाऊंटवर सक्रिय झाले आहेत. 

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर "मी परत आलोय." असा उल्लेख करत पोस्ट केली आहे. तसेच, त्यांनी पोस्ट करताना एक व्हिडीओही शेअर केला आहे. 2016 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विजयी भाषण देतानाचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या व्हिडीओची एक 12 सेकंदांची क्लिप शेअर केली आहे. "तुम्हाला इतका वेळ वाट पाहण्यास लावल्याबद्दल क्षमस्व", असं ट्रम्प यांनी त्या भाषणाच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

युट्यूबवर 2.6 मिलियन सब्सक्रायबर्स

रिपब्लिकन पक्षाचे 76 वर्षीय नेते डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. ट्रम्प यांचे फेसबुकवर तब्बल 34 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर त्यांचे 2.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. 6 जानेवारी 2021 रोजी जो बायडन यांच्या विजयानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी यूएस कॅपिटलवर हल्ला केला होता. याच हिंसाचार प्रकरणी कारवाई करत डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली होती. 

YouTube नं अकाऊंट रिस्टोअर करत दिला 'हा' मेसेज

YouTube ने ट्रम्प यांचं अकाऊंट रिस्टोअर केलं. त्यानंतर युट्यूबने त्यांना एक मेसेजही केला आहे. "आजपासून, डोनाल्ड जे. ट्रम्प चॅनल यापुढे Restricted नाही. तुम्ही नवा कंटेन्ट अपलोड करु शकता." तसेच, सोशल नेटवर्किंग जायंट मेटानं जानेवारीमध्ये घोषणा केली होती की, ते फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंंट्सवरील बंदी हटवत आहेत." 

ट्रम्प यांनी बंदीनंतर ट्रुथ सोशल (Truth Social) लॉन्च केला

87 मिलियन फॉलोअर्स असलेलं डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंटही यूएस कॅपिटल हिंसाचारानंतर ब्लॉक करण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल लाँच केलं होतं. त्यानंतर, जेव्हा ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला. त्यावेळी त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांचं बंद केलेलं ट्विटर अकाऊंट रिस्टोअर केलं होतं. परंतु त्यांनी अद्याप पोस्ट केलेली नाही. 2016 मध्ये ट्रम्प यांच्या धक्कादायक विजयाचं श्रेय सोशल मीडियावरील त्यांच्या डिजिटल प्रचाराला दिलं जातं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget