Trump-Putin Meet in Alaska: एकमेकांचे कट्टर दुश्मन, पण पुतीन यांच्या स्वागताला डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोटोकॉल मोडला, अलास्कातील बैठक निष्फळ, भारताचं टेन्शन कायम
Trump-Putin Meet in Alaska: जगाचं लक्ष लागलेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यातली महाबैठक नुकतीच संपन्न झालीय.

Donald Trump Vladimir Putin Alaska Meeting : जगाचं लक्ष लागलेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यातली महाबैठक नुकतीच संपन्न झालीय. पुतिन आणि ट्रम्प यांच्यात 3 तास रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली, मात्र या बैठकीतून काहीच निष्पण झालं नाहीय. त्यामुळे भारताच्या टॅरिफबाबत अजूनही साशंकता वर्तवली जात आहे. दरम्यान दोघांमध्ये ही बैठक अलास्कात झाली. दोघांनीही बैठकीनंतर एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. रशियाची सुरक्षा सर्वप्रथम असल्याचं वक्तव्य पुतिन यांनी पत्रकार परिषदेत केलं. तर युक्रेनमध्ये जे सुरूय त्याला सर्वतोपरी झेलेन्स्की जबाबदार असल्याचंही पुतिन यांनी म्हटलंय. तर ट्रम्प यांनी यासंदर्भात पुढाकार घेतल्याबद्दल पुतिन यांनी आभार मानलेत.
दरम्यान, यानंतर ट्रम्प यांनी बोलताना पुतिन यांच्यासोबतची बैठक सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया दिलीय. काही मोठ्या मुद्द्यांवर सहमती झाली नाही, पण पुतिन यांच्यासोबत नेहमीच संबंध चांगले राहतील. असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेनंतर वक्तव्य केलंय.
ट्रम्प यांनी पुन्हा भेटू, पुतिन यांचं मॉस्कोत भेटीचे निमंत्रण
अशातच, पत्रकार परिषदेनंतर ट्रम्प यांनी पुन्हा भेटू म्हटल्यावर पुतिन यांनी मॉस्कोत भेटू, असं उत्तर दिलंय. त्यामुळे पुन्हा बैठक होण्याची शक्यता या निमित्याने निर्माण झालीय. असे असले तरी तुर्तास भारताची चिंता कायम आहे. या चर्चेसाठी पुतीन आले तेंव्हा ट्रम्प स्वतः त्यांच्या स्वागतासाठी विमानापर्यंत गेले होते. दोन्ही नेत्यांत तिथेच दोन वेळा अत्यंत उत्साहात हस्तआंदोलन झालं. इतकंच नाही तर दोघांनीही विमामतळवरून ट्रम्प यांच्या लिमो गाडीतून प्रवास केला. पुढे दोघांमध्ये तीन तास सांगोपांग चर्चा झाली. पण ती तोडग्याशिवाय संपलीय.
पुतीन आणि ट्रम्प यांच्यातली बैठक निष्फळ, तुर्तास भारताची चिंता कायम
पुतीन आणि ट्रम्प यांच्यातली बैठक निष्फळ झाल्यामुळं भारताची वाट बिकट झालीय. पुढच्या काही दिवसांत भारतापुढं काय
1. पुतीन-ट्रम्प बैठकीत तोडगा न निघणं हे भारतासाठी चिंताजनक आहे.
2. भारतीय मालावर सध्या अमेरिकेत 25 टक्के कर लादले आहे.
3. व्यापार चर्चा निष्फळ ठरल्यास भारतावर 27 ऑगस्टपासून 50 टक्के कर लादले जाणार आहे.
4. 27 तारखेच्या आत पुतीन-ट्रम्प-झेलेन्स्की चर्चा होऊन तोडगा निघणं भारतासाठी गरजेचं आहे.
5. रशियानं युद्ध न थांबवल्यास भारतावर 50 टक्क्यांपेक्षा जास्त दंडात्मक कर लागण्याची भीती वर्तवली जात आहे.
युक्रेनविरुद्धच्या युद्धावर पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत तोडगा निघावा, यासाठी ट्रम्प खूप आग्रही होते. तर पुतीन यांना खूश करण्यासाठी ट्रम्प यांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती. पुतीन यांना घेण्यासाठी ते स्वतः विमानतळावर आणि तेही अर्धा तास अगोदर जाऊन थांबले. पुतीन यांच्या स्वागतासाठी विमानतळावरच रेड कार्पेट टाकण्यात आलं होते. रेड कार्पेटच्या बाजूला एफ-22 जातीची चार लढाऊ विमानं तैनात करुन ठेवली होती. पुतीन त्यांच्या विमानातून बाहेर येताच ट्रम्प यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. दोन्ही नेत्यांमध्ये दोन वेळा उत्साहात हस्तांदोलन करण्यात आलं. आकाशातून लढाऊ विमानं आणि बी-2 जातीच्या स्पिरिट स्टील्थ बाँबर विमानासह अमेरिकेच्या विमानांचा एक ताफाही गेला.
ट्रम्प यांच्या लिमोझिन गाडीतून एकत्र प्रवास
दरम्यान, बैठकीच्या ठिकाणी जाण्यासाठी पुतीन यांच्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था केली होती, पण ट्रम्प यांनी माझ्या ऑरस लिमोझिन गाडीतून जाऊ या, अशी विनंती केली आणि पुतीन यांनीही ती तात्काळ स्विकारली. दोन्ही नेते एकाच गाडीतून बैठकीच्या ठिकाणी पोचले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























