![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Diwali 2022: न्यूयॉर्कमध्ये दिवाळीचा उत्साह; प्रशासनाकडून शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर
Diwali 2022: अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमधील शाळांना आता दिवाळीची सुट्टी असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून होणार आहे.
![Diwali 2022: न्यूयॉर्कमध्ये दिवाळीचा उत्साह; प्रशासनाकडून शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर Diwali will be honored as an official holiday in New York City schools from year 2023 Diwali 2022: न्यूयॉर्कमध्ये दिवाळीचा उत्साह; प्रशासनाकडून शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/8ec9ac4ac4b52ee3523f5d58af78ef461666413096685290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Diwali 2022: भारतीय दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परदेशात असणारे भारतीयदेखील मोठ्या उत्साहाने दिवाळीचा सण साजरा करतात. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्येही दिवाळीचा उत्साह आणखी दिसून येणार आहे. स्थानिक प्रशासनाने शाळांना दिवाळीनिमित्ताने सुट्टी जाहीर केली आहे. न्यूयॉर्क शहराच्या महापौर एरिक एडम्स यांनी सांगितले की, शहरात दिवाळीची सुट्टी देण्याचा विचार दीर्घकाळापासून सुरू होता. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकन विद्यार्थी दिवाळीबाबत जाणून घेतील आणि मुख्य म्हणजे लोकांमध्ये सर्वसमावेशक संस्कृतीबाबतचा संदेश जाईल असेही त्यांनी सांगितले.
पुढील वर्षांपासून म्हणजे 2023 मध्ये न्यूयॉर्क शहरातील सर्व शासकीय शाळांना दिवाळीची सुट्टी असणार आहे. महापौर एरिक एडम्स यांनी सांगितले की, भारतीय-अमेरिकन समुदायाकडून दिवाळीच्या सुट्टीची मागणी केली जात होती. त्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करण्यात आला आहे. यामुळे आता भारतीयांच्या या सणाचे महत्त्व अमेरिकन विद्यार्थ्यांनादेखील समजणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Thank you New York Mayor Eric Adams @NYCMayor for making #Diwali a public school holiday in New York City.
— India in New York (@IndiainNewYork) October 20, 2022
Happy Diwali!
Link: https://t.co/rvoGL82OAm@IndianDiplomacy @MEAIndia @IndianEmbassyUS @DDNational @DDNewslive @airnewsalerts pic.twitter.com/QgM5e5M0bp
न्यूयॉर्क राज्याच्या विधानसभेत दिवाळीसाठीच्या सुट्टीचे विधेयक मांडणाऱ्या जेनिफर राजकुमार यांनी सांगितले की, दक्षिण आशियाई आणि इंडो-कॅरेबियन, इंडो-अमेरिकन नागरिकांना या राज्यासाठी, देशासाठी मोलाचे योगदान दिले आहे. न्यूयॉर्कमध्ये हिंदू, बौद्ध , शीख, जैन आदी विविध धर्माचे नागरिक दिवाळी साजरी करतात. या नागरिकांची संख्या जवळपास दोन लाखांच्या आसपास आहे. दिवाळी निमित्ताने सुट्टी देण्यासाठी दिवस नसल्याचे काहींनी मांडले होते. मात्र, नियमांनुसार, ही सुट्टी देण्यात आली असून इतर अनावश्यक वाटणारी सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क शहर हे सर्वसमावेशक, परस्परांच्या संस्कृतीचा आदर करणारे शहर असल्याचे दाखवून देण्याची संधी या निमित्ताने मिळाली असल्याचे महापौर अॅडम्स यांनी सांगितले. अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी संख्या आहे. त्याशिवाय इंडो-कॅरेबियन नागरिकही वास्तव्य करतात. त्यामुळे अमेरिकेत प्रमुख भारतीय सण उत्सव हे उत्साहाने साजरे केले जातात.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)