एक्स्प्लोर

Davos Agenda Summit : आजपासून दाओस परिषद; पंतप्रधान मोदींचं आज विशेष संबोधन

Davos Agenda 2022 : आजपासून दावोस परिषदेला सुरूवात होणार आहे. ही परिषद पाच दिवस चालणार आहे. यात आज सोमवारी पंतप्रधान मोदी विशेष भाषण करणार आहेत.

Davos Agenda 2022 : आजपासून दावोस परिषदेला सुरूवात होणार आहे. ही परिषद पाच दिवस चालणार आहे. जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) दाओस परिषदेचे या वर्षी ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभाग घेणार आहेत. आज सोमवारी, भारतीय वेळेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8:30 वाजता जागतिक आर्थिक मंचाच्या दाओस बैठकीत  ‘जागतिक परिस्थिती'  या विषयावर विशेष भाषण करणार आहेत.

17 ते 21 जानेवारी 2022 दरम्यान आभासी माध्यमातून कार्यक्रम होणार आहे.  जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ, युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुवा वॉन डर लेयन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो, इस्रायलचे पंतप्रधान  नफ्ताली बेनेट, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अन्य अनेक राष्ट्रप्रमुख भाषण करणार आहेत. या कार्यक्रमात आघाडीचे उद्योग प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरी समाज प्रतिनिधींचाही सहभाग असेल, या कार्यक्रमातील सहभागी आज जगासमोर असलेल्या गंभीर आव्हानांवर विचारमंथन करतील आणि त्यांना कसे तोंड द्यायचे  याबद्दल चर्चा करतील.

जगभरात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या वर्षी प्रत्यक्ष परिषदेचे आयोजन रद्द करण्यात येत असून ते व्हर्च्युअली पद्धतीने आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. 
 
काय आहे दाओस परिषद? 
दाओस हे स्वित्झर्लंडमधील लँड वासर नदीच्या काठावर वसलेलं सुंदर खेडं आहे. हे गाव स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरागांनी वेढलेलं आहे. या गावाची लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे ठिकाण आहे. दावोसमध्ये दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीसाठी जगभरातील बडे नेते आणि उद्योगपती आपली उपस्थिती लावतात. दरवर्षी या बैठकीत जवळपास 2500 व्यक्ती सहभाग घेतात. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जीनेव्हामध्ये आहे. या संस्थेच्या माध्यमातून जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात आणि जागतिक विकासाला चालना देण्यासंबंधी धोरण निश्चित करतात. पाच दिवस चालणाऱ्या या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील बड्या व्यक्ती सहभाग घेतात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBatenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget