एक्स्प्लोर
Advertisement
दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य केक
दुबईतल्या ब्रॉडवे बेकरीने हा केक खास भारताच्या 70 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तयार केला आहे. त्यांच्या एका खास ग्राहकाच्या इच्छेखातर हा केक बनवण्यात आला.
दुबई : दुबईमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने 26 लाखांचा केक बनवण्यात आला आहे. तब्बल 54 किलो वजनाच्या या केकची थिम अभिनेता आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमाची आहे.
दुबईतल्या ब्रॉडवे बेकरीने हा केक खास भारताच्या 70 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तयार केला आहे. त्यांच्या एका खास ग्राहकाच्या इच्छेखातर हा केक बनवण्यात आला.
केक बनवण्यासाठी शुगर फाँडन्ट, चॉकलेट स्पंज, चॉकलेट गनाश, बेल्जिअन डार्क चॉकलेट आणि 75 ग्रॅम एडिबल गोल्ड पावडर वापरण्यात आली.
आमिर खान त्यांच्या 2 मुलींना शेतात प्रशिक्षण देतानाचं चित्र या केकवर आहे. हा केक जगातील सर्वात महाग केक असल्याचा दावा ब्रॉडवे बेकरीने केला आहे. केक बनवायला तीन आठवड्यांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली आणि अडीचशे लोक हा केक खाऊ शकतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement