ब्रिटनची महाराणीची हत्या करण्यासाठी युवक राजमहालात, जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्याचा प्रयत्न
Man Threatens To Assassinate Queen Elizabeth : एका भारतीय वंशाच्या शीख युवकाने ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या हत्येची धमकी दिली होती. त्यासाठी त्याने राजवाड्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
Man Threatens To Assassinate Queen Elizabeth : जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी एका भारतीय वंशाच्या शीख युवकाने ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राजवाड्यात धनुष्य बाण घेऊन प्रवेश केला. ब्रिटीश राणी एलिझाबेथ ख्रिसमस साजरा करण्यासाठी विंडसर कॅसल येथे पोहोचल्या आहेत. या हल्लेखोराचे नाव जसवंत सिंह चैल असून तो 19 वर्षांचा आहे. वर्ष 1919 मधील अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी ब्रिटनच्या राणीला ठार करण्यासाठी आला होता, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याला मानसिक आरोग्य कायद्यान्वये ताब्यात घेतले आहे.
'द सन'च्या वृत्तानुसार, लंडन पोलिसांकडून त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. जसवंत सिंह याला वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. जसवंत सिंहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये संशयित हल्लेखोर जसवंत सिंहकडे धनुष्य बाण असल्याचे दिसत आहे. जसवंत सिंहने ख्रिसमसच्या दिवशी सकाळी 8:06 वाजता स्नॅपचॅटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याला विंडसर कॅसलमधूल ताब्यात घेण्यात आले आहे.
व्हिडिओत जसवंतने आवाज लपवण्यासाठी फिल्टरचा वापर केला होता. त्याने हुडी आणि मास्क घातला होता. त्याची वेशभूषा 'स्टार वॉर' या चित्रपटापासून प्रेरित असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, 'मला माफ करा. मी जे करणार आहे त्याबद्दल मला क्षमा करा. महाराणी एलिझाबेथला मारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याने व्हिडिओत म्हटले. वर्ष 1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडात ठार झालेल्या नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे त्याने व्हिडिओत सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- कोरोनाचा जगभरात पुन्हा हाहा:कार, फ्रान्समध्ये एका दिवसात सव्वा लाख बाधित, जाणून घ्या इतर देशांमधील परिस्थिती
- महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण महाराज आहे तरी कोण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha