एक्स्प्लोर

कोरोनाचा जगभरात पुन्हा हाहा:कार, फ्रान्समध्ये एका दिवसात सव्वा लाख बाधित, जाणून घ्या इतर देशांमधील परिस्थिती

Coronavirus updates : जगभरात कोरोना महासाथीचा आजार पुन्हा एकदा फैलावत आहे. फ्रान्ससह इतर देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

Coronavirus Updates in World : कोरोना महासाथीने जगभरात पुन्हा एकदा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये फैलावला आहे. तर, ब्रिटन, फ्रान्स, इटलीमध्ये बाधितांची उच्चांकी नोंद होत आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवसात जवळपास सव्वा लाख कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. फ्रान्स व इतर देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मृतांची संख्या कमी असल्याने कोरोना झुंजणाऱ्या देशांना दिलासा मिळाला आहे. 

फ्रान्समधील शहर मर्से रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ज्युलियन कार्वेली यांनी म्हटले की, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये बहुतांशी जणांनी लस घेतली नाही. शनिवारी फ्रान्समध्ये एक लाख 4 हजार 611 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. फ्रान्समध्ये 76 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. फ्रान्स सरकारने ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संभाव्य धोक्याला अधिक गंभीरपणे घेतले असून दोन डोस घेतलेले नागरीक तीन महिन्यानंतर बुस्टर घेऊ शकतात असे सरकारने म्हटले आहे. 

इटलीत सलग तिसऱ्या दिवशी 50 हजार बाधितांची नोंद 

इटलीमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चिंतेचे वातावरण आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या 50 हजारांहून अधिक बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 144 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने देशभरात मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. 

ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एक लाखांहून अधिक बाधित

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधितांच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली. बाधितांची संख्या वाढत असली तरी मृतांची संख्या अतिशय कमी आहे. ब्रिटनमधील लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 50 लाख लोकांनी लस घेतली नाही. 


अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

शनिवारी कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली. शनिवारी 58 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी हा आकडा 1 लाख 84 हजारांवर पोहोचला होता. या दरम्यान 108 बाधितांचा मृत्यू झाला. 'सीडीसी'ने याबाबत बोलताना सांगितले की, अमेरिकेतील एकूण बाधितांपैकी सात टक्के प्रकरणे ही ओमायक्रॉनची आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 8 लाख 37 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget