पुढील महिना सर्वाधिक धोकादायक, ओमायक्रॉन व्हेरियंटवर वैज्ञानिकांचा इशारा
Covid-19 Omicron cases : भारतासह जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाच्या संख्या दररोज वाढत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 161 पर्यंत पोहचली आहे.
Covid-19 Omicron cases : भारतासह जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाच्या संख्या (Omicron Variant Cases) दररोज वाढत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 161 (Omicron Cases Total India) पर्यंत पोहचली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत 32 तर महाराष्ट्रातील रुग्णाच्या संख्या 50 च्या पुढे गेली आहे. जगभरातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सर्व देश सतर्क झाले असले तरीही पुढील महिना सर्वात धोकादायक असल्याचा इशारा जगभरातील वैज्ञानिकांनी दिला आहे.
वॉशिंगटन पोस्टच्या वृत्तानुसार, डेनमार्कमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्ण झपाट्याने वाढत आहे. रुग्णाची संख्या दुपटीने वाढली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून डेनमार्कमधील सीरम इन्स्टिट्यूटने इशारा दिला आहे. ही फक्त सुरुवात आहे, यापुढे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा डेनमार्कमधील सीरम इन्स्टिट्यूटने दिला आहे. येथील वैज्ञानिक टायरा ग्रोव कूस म्हणाले की,' आगामी महिना सर्वात धोकादायक असेल. ओमायक्रॉन व्हेरियंटबाबात अद्याप संपूर्ण माहिती मिळाली नाही.' डेनमार्कमधील रुग्णालयात ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत वाढ होईल, असा अंदाजही वर्तवला जातोय.
टायरा ग्रोव कूस यांनी सांगितलं की, डेनमार्कमधील समोर आलेल्या आकडेवारीनुसार लसीचे दोन डोस घेतले असले तरीही तितकाच धोका असेल. पण ज्यांनी लसीचा बूस्टर डोस घेतलाय, त्यांना कोरोना होण्याचा धोका कमी आहे. 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकामधील गोटेंग प्रोव्हिंस येथे ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. 26 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO ) या विषाणूला धोकादायक म्हणून घोषीत केलं होतं.
वाशिंगटन पोस्टच्या वृत्तानुसार, जगभरातील 89 देशात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. वॉशिंगटन पोस्टशी बोलताना टायरा ग्रोव कूस यांनी सांगितलं की, डेनमार्कमध्ये जानेवारीत दैनंदिन 500 पेक्षा जास्त ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद होऊ शकते. डेल्टा व्हेरियंटप्रमाणे याचा प्रसार झाल्यास ही संख्या 800 पेक्षा जास्तपर्यंत जाऊ शकते. डेनमार्कमध्ये आतापर्यंत कधीच पाच हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णाची नोंद झाली नव्हती. मात्र, शुक्रवारी डेनमार्कमध्ये 11 हजार रुग्णाची नोंद झाली होती.
UPDATED: Technical Brief & Priority Actions for Member States on enhancing readiness for Omicron https://t.co/tOu6iIvFZP #COVID19 pic.twitter.com/AIq7knDT5K
— World Health Organization (WHO) (@WHO) December 19, 2021
भारतामधील परिस्थिती काय? (India Omicron cases)
भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 161 (Omicron Cases Total India) पर्यंत पोहचली आहे. यामधील एका रुग्णाची स्थिती गंभीर आहे तर 42 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. 12 राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्ली 32, तेलंगणा- 20, राजस्थान-17, गुजरात- 13, केरळ-11, कर्नाटक-8, उत्तर प्रदेश 2 आणि तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंडीगढमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळले आहेत.