Pune paranay pathole elon musk Meet:पोरानं करुन दाखवलं! पुण्यातील प्रणय पाटोळे इलॉन मस्क यांना भेटायला थेट पोहचला अमेरिकेत; ट्विटरवर झाली होती दोघांची दोस्ती
पुण्यातील इंजिनियर प्रणय पाथोळे हा थेट टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ इलॉन मस्क यांना भेटायला अमेरिकेत पोहचला. प्रणय पाथोळे आणि इलॉन मस्क हे ट्विटरवरील मित्र आहेत.
Pune paranay pathole elon musk Meet: पुण्यातील इंजिनियर प्रणय पाटोळे (Pranau pathole) हा थेट टेस्ला (tesla) आणि स्पेस एक्सचे सीईओ इलॉन मस्क (elon Musk) यांना भेटायला अमेरिकेत पोहचला. प्रणय पाटोळे आणि इलॉन मस्क हे ट्विटरवरील मित्र आहेत. कायम एकमेकांच्या ट्विटला मिश्किल उत्तरे देत असतात. मात्र आता प्रणयने थेट टेक्सासमधील गिगाफॅक्टरी येथे त्यांची भेट घेतली आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केलं आहे. त्यात त्याने इलॉन मस्क तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात, असं लिहिलं आहे. त्याच्या या भेटीची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे.
ट्विटरवर शेअर केला फोटो
प्रणयने ट्विटरवर इलॉन मस्क यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच एक सुंदर कॅप्शनदेखील लिहिलं आहे. इलॉन मस्क यांनी प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला. गीगाफॅक्टरी टेक्सास येथे इलॉन मस्क यांच्यासोबत झालेली भेट खूप छान होती. इतकी नम्र आणि साधी व्यक्ती मी कधीच पाहिली नाही. तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात, असं प्रणयने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
2018 पासून ट्विटरवर आहेत मित्र
इलॉन मस्क आणि प्रणय पाटोळे हे 2018 पासून Twitter वर मित्र आहेत. दोघेही कायम ट्विटरवर अनेक विषयांवर चर्चा करत असतात. नव्या नव्या कल्पना शेअर करत असतात. सोबतच मजेदार रिप्लाय देत असतात. स्पेस, कार हे दोघांच्या चर्चेचे आवडते विषय आहेत. 2018 मध्ये प्रणय इंजिनीअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्यावेळी त्याने टेस्लाच्या स्वयंचलित विंडस्क्रीन वायपर्समधील त्रुटींबद्दल ट्विट केलं होतं. त्यावर मस्क यांनी लगेच उत्तर दिलं होतं त्यामुळे दोघांची ट्विटरवर ओळख झाली होती. प्रणय आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) साठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो.
It was so great meeting you @elonmusk at the Gigafactory Texas. Never seen such a humble and down-to-earth person. You're an inspiration to the millions 💕 pic.twitter.com/TDthgWlOEV
— Pranay Pathole (@PPathole) August 22, 2022
विनोदी ट्विटदेखील होतात व्हायरल
बर्याच लोकांना वाटते की इलॉन मस्क माझे ट्विटर खाते चालवतो आणि ते खरे आहे. तो खूप व्यस्त माणूस आहे, रॉकेट बनवतो, भविष्यासाठी इलेक्ट्रिक वाहने बनवतो, बोगदे खोदतो आणि कसा तरी त्याला वेळ मिळतो. एकाधिक Twitter खाती चालवा.. होय,असं प्रणयने केलं होतं. त्यावर एलॉन मस्कने मजेदार रिप्लाय दिला होता. त्यात ते म्हणाले होते की माझ्याकडे बर्नर ट्विटर खाते देखील नाही! माझे एक अतिशय गुप्त Instagram खाते आहे त्यामुळे मी मित्रांनी मला पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू शकतो. हा रिप्लाय व्हायरल झाला होता. प्रणय पाटोळे याचे ट्विटरवर दीडलाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.