Covid-19 | 213 देशांमध्ये 76 लाख लोकांना कोरोनाची लागण; 4.2 लाख लोकांचा मृत्यू, तर 51टक्के रुग्ण कोरोनामुक्त
जगभरात कोरोनाचा कहर. आतापर्यंत 213 देशांमध्ये 75 लाख 83 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर 4 लाख 23 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
![Covid-19 | 213 देशांमध्ये 76 लाख लोकांना कोरोनाची लागण; 4.2 लाख लोकांचा मृत्यू, तर 51टक्के रुग्ण कोरोनामुक्त corornavirus World Corona Update death toll reaches above 4 lakh 23 thousands in world 12 june 2020 Covid-19 | 213 देशांमध्ये 76 लाख लोकांना कोरोनाची लागण; 4.2 लाख लोकांचा मृत्यू, तर 51टक्के रुग्ण कोरोनामुक्त](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/12173600/corona-world.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus | जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 36 हजार नवे कोरोना बाधित आढळून आले असून मृतांचा आकडा 4946 ने वाढला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 75 लाख 83 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 23 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 38 लाख 35 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. जगभरातील जवळपास 60 टक्के रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 45 लाख एवढी आहे.
जगभरात कुठे किती रुग्ण?
कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेत दिसून आला आहे. अमेरिकेमध्ये 21 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या कोरोनाचं नवं केंद्र ब्राझील असल्याचं समोर येत आहे. ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये ब्राझीलमध्ये 30,465 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, तर 1261 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अमेरिकेत गेल्या 24 तासांत 23283 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 899 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे.
अमेरिका : एकूण रुग्ण 2,089,684, एकूण मृत्यू 116,029 ब्राजील : एकूण रुग्ण 805,649, एकूण मृत्यू 41,058 रूस : एकूण रुग्ण 502,436, एकूण मृत्यू 6,532 भारत : एकूण रुग्ण 298,283, एकूण मृत्यू 8,501 यूके : एकूण रुग्ण 291,409, एकूण मृत्यू 41,279 स्पेन : एकूण रुग्ण 289,787, एकूण मृत्यू 27,136 इटली : एकूण रुग्ण 236,142, एकूण मृत्यू 34,167 पेरू : एकूण रुग्ण 214,788, एकूण मृत्यू 6,109 जर्मनी : एकूण रुग्ण 186,795, एकूण मृत्यू 8,851 इराण : एकूण रुग्ण 180,156, एकूण मृत्यू 8,584
8 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण
ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत जिथे एक लाखांहून अधिक रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राजील, ब्रिटेन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मृतांचा आकडा 1.16 लाखा पार पोहोचला आहे. चीन टॉप-17 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर गेला आहे. तर भारताचा समावेश टॉप-4 कोरोना बाधित देशांमध्ये झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
'कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या सीमेवर कुरापती', तिबेटच्या राष्ट्रपतींचा चीनवर गंभीर आरोप
'संकटाच्या काळात आशावादी राहा'; गूगल सीईओ सुंदर पिचई यांचा विद्यार्थांना कानमंत्र
न्यूझीलंड देश कोरोनामुक्त, पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांची घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)