एक्स्प्लोर
Advertisement
'कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या सीमेवर कुरापती', तिबेटच्या राष्ट्रपतींचा चीनवर गंभीर आरोप
कोरोनावरुन सध्या चीनवर चोहीबाजूंनी टीका होत आहे. अमेरिकेने चीनवर उघड आरोप केल्यानंतर आणखी काही देशांनी चीन कोरोनासाठी जबाबदार असल्याचं म्हटलंय. आता तिबेटच्या राष्ट्रपतींनी देखील चीनवर गंभीर आरोप केला आहे.
नवी दिल्ली : कोरोनावरुन सध्या चीनवर चोहीबाजूंनी टीका होत आहे. अमेरिकेने चीनवर उघड आरोप केल्यानंतर आणखी काही देशांनी चीन कोरोनासाठी जबाबदार असल्याचं म्हटलंय. आता तिबेटच्या राष्ट्रपतींनी देखील चीनवर गंभीर आरोप केला आहे. कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारतीय सीमेवर कुरापती सुरु असल्याचं तिबेटचे राष्ट्रपती लोबसँग सॅनगे यांनी म्हटलं आहे. वुहानमधून पसरलेल्या कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारताच्या सीमेवर बैठका सुरु आहेत असा गंभीर आरोप तिबेटच्या राष्ट्रपतींनी केला आहे.
'द प्रिंट'ला मुलाखत देताना सेंट्रल तिबेटियन अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख लोबसँग सॅनगे यांनी चीनवर गंभीर हे आरोप केले आहेत. सॅनगे म्हणाले की, अमेरिकेशी बिघडलेल्या आर्थिक संबंधांवरुन चीनमध्ये तणाव आहेत, तिथल्या राज्यकर्त्यांबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यावरुन लक्ष हटवण्यासाठी चीन हाँगकाँग आणि भारताच्या सीमेवर उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले.
सॅनगे म्हणाले की, चीनबद्दल जगभरात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात युरोप, ऑस्ट्रेलिया, जर्मनीही संशयानं पाहात आहे. 130 देशांनी मिळून कोरोना विषाणूच्या निर्मिती आणि प्रसार कसा झाला याच्या चौकशीचीही तयारी केली आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या 60 वर्षापासून चीन हेच करत आहे. आणि त्यांच्या अशा अतिक्रमणाचा फटका सगळ्या शेजारी राष्ट्रांना सहन करावा लागतोय.
2012 मध्ये सॅनगे यांना तिबेटचं राष्ट्रपती घोषित करण्यात आलं. पण चीनच्या अधिपत्यामुळे ते हद्दपार झाले. सध्या ते धरमशालात राहतात.
भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक पूर्ण; चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
दोन्हीकडील सैन्य मागे घेण्याबाबत दोन्ही देशांचा विचार
भारत-चीन सीमेवर दिवसेंदिवस तणाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारत चीनमध्ये सीमावादावर महत्वाच्या बैठका पार पडत आहेत. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर स्तरावरची ही सर्वोच्च चर्चा वाढलेल्या तणावाला शांत करु शकणार का? हा प्रश्न आहे. बुधवारी सुद्धा दोन्ही देशात मेजर जनरल स्तरावरची चर्चा झाली. पूर्व लडाखमधील पॅट्रोलिंग पॉईंट 14 अशा अनेक भागातील दोन्ही बाजूचे सैन्य मागे घेण्याबाबत यावर विचार झाला. पीपी 15, पीपी 17 चुशुल आणि पँगॉग तलावाजवळील भाग या महत्वाच्या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement