Coronavirus | जगभरात 85 लाखांहून अधिक कोरोना बाधित, तर 44 लाख रुग्ण कोरोनामुक्त
जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 85 लाखांच्या पार पोहोचली आहे, तर 44 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
Coronavirus World Update | जगभरात कोरोना व्हायरसने संपूर्ण जग वेठीस धरले आहे. दरदिवशी नवे कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोनामुळे 85 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने जवळपास चार लाख 55 हजार लोकांचे बळी घेतले आहेत. आतापर्यंत 44 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्म फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक झाली आहे.
जगभरात कोणत्या देशात काय परिस्थिती?
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोक आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. तर एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे.
अमेरिका | एकूण रुग्ण : 2,263,651 | एकूण मृत्यू : 120,688 |
ब्राझील | एकूण रुग्ण : 983,359 | एकूण मृत्यू : 47,869 |
रशिया | एकूण रुग्ण : 561,091 | एकूण मृत्यू : 7,660 |
भारत | एकूण रुग्ण : 381,091 | एकूण मृत्यू : 12,604 |
यूके | एकूण रुग्ण : 300,469 | एकूण मृत्यू : 42,288 |
स्पेन | एकूण रुग्ण : 292,348 | एकूण मृत्यू : 27,136 |
पेरू | एकूण रुग्ण : 244,388 | एकूण मृत्यू : 7,461 |
इटली | एकूण रुग्ण : 238,159 | एकूण मृत्यू : 34,514 |
इराण | एकूण रुग्ण : 197,647 | एकूण मृत्यू : 9,272 |
जर्मनी | एकूण रुग्ण : 190,126 | एकूण मृत्यू : 8,946 |