एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus World Update | फ्रान्समध्ये 11 मेपर्यंत वाढला लॉकडाऊन; जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 लाख पार
संपूर्ण जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देशांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये आपत्ती कायदा लागू केला गेला आहे. तर फ्रान्समध्ये लॉकडाऊन 11 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हतबल आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील असंख्य लोक आपल्या घरातच कैद आहेत. अशातच मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाशी लढणाऱ्या फ्रान्समध्ये हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आता फ्रान्समध्ये 11 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी यासंदर्भात घोषणा केली. तसेच जगभरात आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.
फ्रान्समध्ये 11 मेपर्यंत लॉकडाऊन
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, 'देशामध्ये 11 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तसेच आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, या लॉकडाऊनच्या काळात कोरोना व्हायरस व्यतिरिक्त दुसऱ्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतील. त्यांनी लिहिलं आहे की, 11 मेनंतर हळूहळू शाळा सुरू करण्यात येतील.
जगभरात आतापर्यंत 1,19,413 लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1,19,413 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 18 लाख पार पोहोचली आहे. जगभरात आतापर्यंत 19,20,258 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोना बाधित असून जगभरातील सर्वाधिक मृतांची संख्याही अमेरिकेत आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. तर 22 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये आहे.
कोरोना व्हायरसमुळए सर्वाधिक प्रभावित 5 देश
गेल्या 24 तासांत कोणत्या देशांत काय परिस्थिती?
याव्यतिरिक्त आतापर्यंत जगभरात लाखांहून अधिक लोक रिकव्हर झाले आहेत. दरम्यान, जगभरात 13, 57,059 कोरोना बाधित आहेत. जगभरात सर्वाधिक कोरोनाच्या तपासण्या अमेरिकेमध्ये केल्या गेल्या आहेत. येथे आतापर्यंत 29, 36,843 लोकांच्या तपासणी केली आहे. त्यानंतर जर्मनी, रूस आणि इटलीमध्ये सर्वाधिक तपासण्या करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज
Coronavirus | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा; आयसीयूमधून बाहेर
Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू
देश | एकूण कोरोना बाधित | नवीन रूग्ण | एकूण मृत्यू | गेल्या 24 तासांत मृत्यू |
अमेरिका | 584,862 | 24,562 | 23,555 | 1,450 |
स्पेन | 170,099 | 3,268 | 17,756 | 547 |
इटली | 159,516 | 3,153 | 20,465 | 566 |
फ्रान्स | 136,779 | 4,188 | 14,967 | 574 |
जर्मनी | 129,207 | 1,353 | 3,118 | 96 |
देश | नवीन रूग्ण | मृत्यू |
अमेरिका | 24,562 | 1,450 |
ब्रिटन | 4,342 | 717 |
फ्रान्स | 4,188 | 574 |
टर्की | 4,093 | 98 |
स्पेन | 3,268 | 547 |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement