एक्स्प्लोर

Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 32 लाखांवर तर 10 लाख रुग्ण बरे

जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 32 लाखांच्या वर पोहोचला आहे.

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 28 हजारांच्या वर पोहोचली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 28 हजार 190लोकांचा मृत्यू झाला आहे.  कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 32 लाख 19 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 10 लाख रुग्ण बरे झाले आहेत.  मागील 24 तासात 81,319 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 6,538 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 210 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. अमेरिकेने गेल्या २४ तासात २,३९० लोक गमावले, एकूण बळी ६१ हजार ६५६, रुग्णांची संख्या १० लाख ६४ हजार १९० इतकी झाली आहे. न्यूयॉर्क प्रांतात काल ३३० बळी, तिथे एकूण मृतांचा आकडा २३,४७४ तर रुग्णांची संख्या ३ लाख ६ हजार १६८इतकी आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत ६,७७०, मिशिगन मध्ये ३,६७०, मासाचुसेट्स ३,४०७, पेनसिल्वानिया २३५४, , इलिनॉईस २२१५, कनेक्टिकट २१६८, कॅलिफोर्निया १९३९, लुझियाना १८४५, फ्लोरिडा १२१८,आणि वॉशिंग्टनमध्ये ८०१ लोकांचा बळी या रोगाने घेतलाय. स्पेनने गेल्या चोवीस तासात ४५३ लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा २४ हजार २७५ वर पोहोचला आहे. काल इटलीत कोविड-१९ रोगाने ३२३ माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या २७ हजार ६८२ इतकी आहे तर काल रुग्णांची संख्या २ हजार ८६ ने वाढली, इटलीत आता जवळपास २ लाख ३ हजार ५०० रुग्ण आहेत. काल इंग्लंडने ७९५ माणसं गमावली मात्र त्यांनी २ मार्चपासून दवाखान्याबाहेर वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या ३८११ मृतांचा समावेश केला. त्यामुळे बळींची संख्या थेट २६ हजारावर पोहोचली. आता इंग्लंडमध्ये अमेरिका आणि इटलीखालोखाल बळी गेले आहेत. फ्रान्सने काल दिवसभरात ४२७ लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत २४ हजार ८७ बळी, एकूण रुग्ण १ लाख ६६ हजारावर आहेत. जर्मनीत काल १५३ बळी गेले, एकूण बळींची संख्या ६,४६७ इतकी झालीय. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल ८० ची भर, एकूण ५,९५७ मृत्यू, रुग्णांची संख्या ९३ हजार ६०० इतकी आहे. कोरोनाने बेल्जियममध्ये काल १७० मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा ७,५०१ इतका आहे. हॉलंडमध्ये काल १४५ बळी घेतले तिथे एकूण ४,७११ लोक दगावले आहेत. टर्की ३०८१, ब्राझील ५५११, स्वित्झर्लंडने १,७१६, स्वीडनमध्ये २४६२, पोर्तुगाल ९७३, कॅनडात २९९६, इंडोनेशिया ७८४,इस्रायल २१५ तर सौदी अरेबियात १५७ बळी कोरोनामुळे गेले आहेत. दक्षिण कोरियात काल १ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २३८ इतका आहे. आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या १५ हजार ५२५ वर पोहोचली आहे, तिथे ३४३ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८१,६७८ तर बळींच्या आकड्यात ६,५९३ ची भर पडली आहे.
  • फ्रांस: कोरोनाबाधित- 166,420, मृत्यू - 24,087
  • यूके: कोरोनाबाधित- 165,221, मृत्यू - 26,097
  • जर्मनी: कोरोनाबाधित- 161,539, मृत्यू - 6,467
  • टर्की: कोरोनाबाधित- 117,589, मृत्यू - 3,081
  • रशिया: कोरोनाबाधित- 99,399, मृत्यू - 972
  • इरान: कोरोनाबाधित- 93,657 मृत्यू - 5,957
  • चीन: कोरोनाबाधित- 82,858, मृत्यू - 4,633
  • ब्राझिल: कोरोनाबाधित- 79,361 मृत्यू - 5,511
  • कॅनडा: कोरोनाबाधित- 51,597, मृत्यू - 2,996
  • भारत - कोरोनाबाधित- 33062, मृत्यू - 1079
संबंधित बातम्या :  दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला! Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू

महत्त्वाच्या बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget