(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus World Update | कोरोनामुळं जगभरात पावनेदोन लाखांहून अधिक बळी, अमेरिकेत सर्वाधिक लोकांचा मृत्यू
जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 25 लाख 57 हजारांवर पोहोचला आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 76 हजारांवर गेली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 176605 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 25 लाख 57 हजारांवर पोहोचली आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे. सहा लाख 90 हजार रुग्ण बरे झाले आहेत तर अजून जवळपास पावणे सोळा लाख 88 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 57 हजार 250 बाधित गंभीर आहेत.
अमेरिकेने गेल्या 24 तासात 2804 लोक कोरोनामुळं गमावले आहेत. अमेरिकेत एकूण बळींची संख्या ही 45 हजार 318 वर जाऊन पोहोचली आहे. तर रुग्णांची संख्या आठ लाख 19 हजारांवर गेली आहे.
न्यूयॉर्क प्रांतात काल 764 बळी गेले आहेत. तिथे रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार तर एकूण मृतांचा आकडा 19693 वर गेला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 4753, मिशिगन मध्ये 2700, मासाचुसेट्स 1961, लुझियाना 1405, इलिनॉईस 1468, कॅलिफोर्निया 1298, पेनसिल्वानिया 1614, कनेक्टिकट 1423 आणि वॉशिंग्टनमध्ये 682 लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.
कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम, प्रसिध्द आल्प्स पर्वतावर भारतीय तिरंगा
स्पेनने गेल्या चोवीस तासात 430 लोक गमावले आहेत. एकूण मृतांचा आकडा 21 हजार 282 वर पोहोचला आहे.
काल इटलीत कोविड-19 रोगाने एका दिवसात 534 माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 24 हजार 648 इतकी झाली आहे.
काल रुग्णांची संख्या 2 हजार 729 ने वाढली, इटलीत आता जवळपास 1 लाख 84 हजार रुग्ण आहेत.
इंग्लंडने दिवसभरात 828 लोकांनी जीव गमावला. तिथला बळींचा आकडा 17337 वर पोहोचला आहे.
फ्रान्सने काल दिवसभरात 531 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 20 हजार 796 बळी गेले आहेत. तर एकूण रुग्ण 1 लाख 58 हजारावर पोहोचले आहेत.
जर्मनीत काल 224 बळी गेले. तिथं एकूण बळींची संख्या 5086 वर पोहोचलीय.
इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 88 ची भर पडली. तिथं एकूण 5297 मृत्यू आतापर्यंत कोरोनामुळं झाले आहेत. तर रुग्णांची संख्या 84800 वर पोहोचलीय.
कोरोनाने बेल्जियममध्ये काल 170 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 5998 वर पोहोचला आहे.
हॉलंडमध्ये काल 165 बळी घेतले तिथे एकूण 3916 लोक दगावले आहेत.
टर्की 2259, ब्राझील 2741, स्वित्झर्लंडने 1478, स्वीडनमध्ये 1765, पोर्तुगाल 762, कॅनडात 1834, इंडोनेशिया 616,इस्रायल 184 तर सौदी अरेबियात 109 बळी कोरोनामुळं गेले आहेत.
दक्षिण कोरियात काल 1 मृतांची भर पडली. तिथं एकूण मृतांचा आकडा 237 झालाय.
आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या 9565 वर पोहोचली आहे. तिथे 201 लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75242 तर बळींच्या आकड्यात 7062 ची भर पडली आहे.
संबंधित बातम्या :
दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला! Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू