एक्स्प्लोर

Corona Vaccine | जगभरात कोरोना लसीचा शोध; 'या' पाच देशांचे दावे काय?

अख्यं जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं आहे. अशातच जगभरातील अनेक देशांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. जाणून घेऊया सध्या कोणत्या देशात कोरोनाच्या लसीबाबत सध्या काय स्थिती आहे?

Coronavirus : संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत दोन लाख 92 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक लोक आपापल्या घरांमध्ये अडकून पडले आहेत. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंच औषध उपलब्ध नाही, त्यामुळे दिवसेंदिवस याचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. या जीवघेण्या व्हायरसवर लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. अनेक देशांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. परंतु, त्यापैकी 5 देश म्हणजेच, अमेरिका, ब्रिटन, चीन, इटली आणि इटली या देशांच्या दाव्यात काहीतरी तथ्य दिसून येत आहे. जाणून घेऊया कोणत्या देशात कोरोनाच्या औषधावर किंवा लसीबाबत सध्या काय स्थिती आहे त्याबाबत...

अमेरिका

अमेरिकेतील दोन कंपन्या कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आगे. मॉडर्ना, ही अमेरिकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅन्ड इनफेक्शियस डिजीजसोबत शोध घेत आहे. तर दुसरी कंपनी फायजर (Pfizer) आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेने गेल्या 24 तासांत 1630 लोक गमावले आहेत. तर एकूण बळी 83 हजार 425 वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या 14 लाख 8 हजारांवर गेली आहे.न्यूयॉर्क प्रांतात काल 172 बळी गेले. तिथे एकूण मृतांचा आकडा 27 हजार 175 तर रुग्णांची संख्या 3 लाख 48 हजारांवर गेली आहे.

ब्रिटन

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने कोरोना वॅक्सीन तयार करण्याचा दावा केला आहे. ब्रिटनने केलेल्या दाव्यानुसार, आता कोरोनाच्या वॅक्सीनचं 200 रूग्णालयांतील जवळपास 5 हजारांहून अधिक लोकांवर परिक्षण करण्यात आलं आहे. म्हणजे, लस तयार केली जाऊन आता सध्या माणसांवर परिक्षण करण्यात येत आहे.

चीन

कोरोनाच्या जन्माचं केंद्र असलेल्या चीनमध्ये तीन वॅक्सिनचं ह्युमन ट्रायल सुरु आहे. पहिल्या वॅक्सीनची चीनमधील कँसिनो बॉयोलॉजिक्स, इन्स्टीट्यूट ऑफ बॉयोटेक्नोलॉजी आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायन्स एकत्र येऊन टेस्ट करत आहेत. तर दुसरं वॅक्सीन LV-SMENP-DC चं शेंजेन जीनोइम्यून मेडिकल इंस्टीट्यूटमध्ये ट्रायल सुरु आहे. तिसरी वॅक्सीनचं चीनमधील वुहान प्रांतात ट्रायल सुरु आहे.

इस्रायल

कोरोनावर वॅक्सीन तयार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्त्रायलच्या दाव्यानुसार, जगभरातील सर्वात रहस्यमयी बायोलॉजिकल रिसर्च लॅबमध्ये कोरोनाची लस तयार करण्यात आलं आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री नेफ्थाली बेनेट्ट यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. इस्रायल इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी कोविड-19 विषाणूच्या अॅन्टिबॉडीज विकसीत केल्या असल्याची माहिती दिली आहे. या अॅन्टिबॉडीज शरिरातील विषाणूंवर हल्ला करतात आणि त्या विषाणुंना निष्क्रीय करतात. जेरुसलेम पोस्टने यांसदर्भातील वृत्त दिले होते.

इटली

इटलीनेदेखील कोरोना वॅक्सीन तयार केलं असल्याचा दावा केला आहे. दाव्यानुसार, इटलीतील रोमच्या स्पल्नजानी रूग्णालयात करण्यात आलेल्या परिक्षणातून अॅन्टिबॉडीज शोधण्यात आल्या आहेत.

गेल्या चोवीस तासात इटलीत कोविड-19 रोगाने 172 माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 30 हजार 911 वर पोहोचली आहे. काल रुग्णांची संख्या 1402 ने वाढली, इटलीत आता जवळपास 2 लाख 21 हजारावर रुग्ण आहेत.

अनेक देशांनी केलेल्या या दाव्यांमुळे कोरोनापुढे हतबल झालेल्या जगासमोर एक आशेचा किरण दिसून आला आहे. आता ही लस कधी येतं आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त कधी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या : 

हलगर्जीपणा झाला तर परिस्थिती गंभीर होईल; लॉकडाऊन शिथील करणाऱ्या देशांना WHOचा इशारा

कोरोनाची लस तयार, लवकरच पेटंट मिळवणार; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget