(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona in China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट, जगभरात चिंतेच वातावरण, दोन वर्षांनतर 3 हजार 300 नवे रुग्ण
Corona in China : चीनमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून शांघायमधील शाळा सध्या बंद केल्या आहेत. जिलिन शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहे.
Corona in China : कोरोनाचे उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये अनेक शहरांत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहायला मिळत आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग होत आहे. रविवारी चीनमध्ये 3,393 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सुमारे दोन वर्षांनंतर चीनमध्ये पहिल्यांदाच 3 हजार 300 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2020 नंतर संसर्गाचा हा सर्वात मोठा दैनिक आकडा आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे अनेक शहरांमध्ये पुन्हा काही निर्बंधही लादले जात आहेत. अनेक शहरांमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. शाळांमधील मुलांचे शिक्षणही विस्कळीत झाले आहे.
चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, शांघायमध्ये शाळा बंद
चीनमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून शांघायमधील शाळा सध्या बंद केल्या आहेत. यासोबतच कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ईशान्येकडील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशातील सुमारे 19 प्रांतांमध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकारांचा प्रादुर्भाव आहे. जिलिन शहर अंशतः बंद करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, रशिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेला लागून असलेले हुनचुन शहर वाढत्या कोरोना रुग्णांमुळे 1 मार्चपासूनच बंद करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात तीन तात्पुरती रुग्णालये बांधण्यात आले आहेत.
कोरोनामुळे जगभरात 60 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू
कोरोना विषाणू सर्वप्रथम चीनमध्येच आढळून आला होता. तेव्हापासून चीनमध्ये झिरो कोविड धोरण लागू आहे. चीनने लॉकडाऊन, प्रवासी बंदी यासह अनेक निर्बंध लागू केले होते. चीनवरच कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोपही करण्यात आला होता. जगभरात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला आहेत. मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जगभराच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांनी 44 कोटींचा आकडा पार केला आहे. तर कोरोना महामारीने मृत्यूंची संख्या 60 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोना संसर्गाची 50 दशलक्षाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर या काळात धोकादायक आजाराने दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Japan : 'पोनिटेल'मध्ये मुलींना पाहून मुलं उत्तेजित होतात म्हणत जपानमधील शाळांनी लावले अजब निर्बंध
- Saudi Arabia : सौदी अरेबियामध्ये एकाच दिवशी 81 जणांना फाशी, मानवाधिकार संघटनांकडून टीका
- Viral Video : आगीपासून वाचवण्यासाठी वडिलांनी मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले, पुढे काय झाले तुम्हीच पाहा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha