दक्षिण आशियातील 60 टक्के लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, ऑक्सफर्डच्या संशोधकांचा दावा
ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनाचा फायदा हा येत्या काळात कोरोना विरोधात अधिक प्रभावी लस निर्मितीसाठी होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Coronavirus : दक्षिण आशियातील 60 टक्के लोक आणि युरोपियन वंशाच्या 15 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या आजाराला अधिक संवेदनशील असलेले जीन्स आढळले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे त्यांना असलेला धोका कमी होऊ शकतो असं ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी म्हटलं आहे. दक्षिण आशियामधील लोकांमध्ये कोविडमुळे फुफ्फुस निकामी होण्याचा आणि त्यामुळे मृत्यूचा धोका दुप्पट करणारं जनुक किंवा जीन्स (GENE)आढळलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेलं याबाबतचं एक संशोधन समोर आलं आहे, त्यात कोविडमुळे फुफ्फुस (Lungs) निकामी होण्याचा धोका दुप्पट करणारं अतिशय धोकादायक (high risk) जनुक (GENE) असल्याचं समोर आलं आहे.
यूके आणि दक्षिण आशियातील काही समुदायांना कोविडचा जास्त धोका का आहे? यावर नेचर जेनेटिक्सनं (The Nature Genetics) अभ्यास केलाय. परंतु, या अभ्यासात पूर्णपणे स्पष्ट काहीच सांगण्यात आलं नाही. आधीच्या काही अनुवांशिकतेवर या रिसर्चमध्ये अभ्यास करण्यात आलाय. जनुकावर अचूक संशोधन करण्यासाठी संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मॉलेक्युलर तंत्राचा वापर केलाय. त्याला LZTFL1 असं म्हटलं जाते. जेनेटिकमध्ये होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल LZTFL1 या तंत्राच्या माध्यमातून महिती मिळते.
अतिशय धोकादायक (high risk) जनुकाची (GENE) आवृत्ती ही आफ्रिकन-कॅरिबियन पार्श्वभूमीतील सुमारे 2 टक्के लोकांमध्ये आणि पूर्व आशियाई लोकांपैकी 1.8 टक्के लोकांमध्ये आढळत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. हे संशोधन करणारे प्रमुख संशोधक प्राध्यापक जेम्स डेव्हिस म्हणतात की, महत्वाचं म्हणजे हा धोकादायक जनुक सर्वांवर सारखाच परिणाम करेल असं नाही. पण डेव्हिस यांच्या मते, याचे गंभीर परिणाम असू शकतात. विशेषत: म्हणजे वयानुसार या धोकादायक जनुकाचे वैयक्तिक वेगवेगळे परिणाम होऊ शकतात.
काही विशिष्ट भागातील लोकांना कोरोना महामारीच्या रोगाचा जास्त परिणाम झाला. काही विशिष्ट ठिकाणावरील लोकांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता. यासाठी सामाजिक आणि आर्थिक घटकही तितकेच महत्वाचे असल्याचं जेम्स डेव्हिस यांनी सांगितलं. आपण आपली अनुवंशिकता बदलू शकत नाही. पण आमच्या संशोधनानुसार, कोरोनाचा सर्वाधिक प्राभावित लोकांना लसीकरणाचा विशेष फायदा होऊ शकतो, असे डेव्हिस यांनी स्पष्ट केलं. संशोधकांच्या मते, कोरोना विषाणूपेक्षा धोकादायक जनुकामुळे अधिक फुफ्फुस अतिसंवेदनशील होतं.
संशोधकांच्या मते, हाय रिस्क व्हर्जन असलेली फुफ्फुसं ही कोरोना व्हायरसला बळी पडण्याची शक्यता अधिक असते. महत्वाचं म्हणजे हे जीन्स असणाऱ्या लोकांची फुफ्फुसं जरी संवेदनशील असली तरी त्याचा परिणाम हा रोगप्रतिकारक शक्तीवर होत नाही. त्यामुळे अशा लोकांना जर कोरोनाची लस दिली तर त्यांना संरक्षण मिळू शकते, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनाचा फायदा हा येत्या काळात कोरोना विरोधात अधिक प्रभावी लस निर्मितीसाठी होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देण्यात येतोय. या ताज्या संशोधनामुळे फुफ्फुसांची शक्ती वाढवण्यासाठी त्यावर काम केलं जाईल हे नक्की.
महत्वाच्या बातम्या :