Coronavirus | एअरलॉक केबिनमध्ये जाऊन किंचाळा किंवा गाणे गा, केवळ तीन मिनीटात होणार कोरोनाचे निदान; डच शास्त्रज्ञाचा नवा अविष्कार
कोरोनाची चाचणी (coronavirus) करण्यासाठी डच शास्त्रज्ञाने एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे. त्याने शोधलेल्या एअरलॉक केबिनमध्ये (airlocked cabin) जाऊन किंचाळल्यास किंवा गाणे गायल्यास केवळ तीन मिनीटात कोरोनाचे निदान होणार असा दावा त्याने केला आहे.
अॅमस्टरडॅम: डचच्या एका संशोधकाने कोरोनाच्या चाचणीसाठी आता अतिजलद आणि सोपी पद्धत शोधून काढली आहे. पीटर वॅन वीज या संशोधकाने एका अशा एअरलॉक केबिनचा शोध लावलाय की ज्यामध्ये जाऊन केवळ ओरडायचं किंवा गाणं म्हणायचं. या एयरलॉक केबिनच्या माध्यमातून तुम्हाला कोरोना झाला आहे का नाही याचं निदान होणार आहे.
कोरोना व्हायरसची स्वॅब टेस्ट वा नोजल टेस्ट ही काहीजणांना आवडत नाही, त्याचा त्रास होतो. अशा व्यक्तींसाठी ही एअरलॉक केबिनची टेस्ट खूप चांगली असल्याचा दावा याच्या संशोधकाने केलाय. या एअरलॉक केबिनच्या माध्यमातून कोरोनाची टेस्ट अतिजलद आणि सोपी होते असेही ते म्हणाले.
A Dutch inventor has come up with what he hopes could be a potentially faster and easier method to screen for coronavirus infections: screaming ????️ https://t.co/74KLRTHcmA 1/4 pic.twitter.com/QnzDhl1lXp
— Reuters Science News (@ReutersScience) March 4, 2021
जर तुम्ही खरोखरच कोरोना पॉझिटिव्ह असाल तर या एयरलॉक केबिनमध्ये तुम्ही ओरडाल किंवा गाणे म्हणाल तर तुम्ही कोरोनाचे हजारो पार्टिकल्स बाहेर टाकाल. त्यावेळी ते पार्टिकल्स डिटेक्ट करुन तुम्हाला कोरोना आहे का नाही याची माहिती दिली जाते. याची खात्री करण्यासाठी पीटर वॅन वीज याने अॅमस्टरडॅम येथील कोरोना सेंटरच्या बाहेर आपली ही एअरलॉक केबिन सुरु केली आहे. त्याचे हे एअरलॉक केबिन शाळा, एयरपोर्ट, कन्सर्ट, कार्यालय या ठिकाणी उपयुक्त असल्याचा दावा संशोधकाने केला आहे.
या एअरलॉक केबिनमध्ये कोरोना व्हायरसचे पार्टिकल्सचे नॅनोमीटर स्केल सायझिंग डिव्हाईसच्या माध्यमातून विश्लेषण केले जाते आणि केवळ तीन मिनीटात आपल्याला कोरोना आहे का नाही याचा रिझल्ट येतो. पीटर वॅन वीज याच्या मते, आपल्या श्वासातून आणि कपड्यावरील अनेक मायक्रो पार्टिकल्सच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचे डिटेक्ट करता येते. पीटर वॅन वीज हा नेदरलॅन्डमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करतो.
Corona Vaccine Centre | लसीकरण केंद्रेचं सुपर स्प्रेडर होत नाहीत ना?