कोरोनासह इतर 21 आजारांवर लस उपलब्ध, सर्वांना लस घेण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन
Corona Vaccine : कोरोनासह इतर 21 आजारांवर संरक्षण होण्यासाठी सध्या लस उपलब्ध आहे. लस घेतल्याने रोगांपासून संरक्षण होते, त्यामुळे नागरिकांना लस घेण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.
Corona Vaccine : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी सध्या जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनावर सध्या लस उपलब्ध आहे. कोरोना लसीमुळे कोविड 19 विषाणूपासून लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मिळते. त्यामुळे जगभरातील प्रत्येक देशातील सरकार नागरिकांचे लसीकरण करण्यावर अधिक भर देत आहे. सध्या कोरोनासह इतर 21 आजारांवर संरक्षण होण्यासाठी सध्या लस उपलब्ध आहे. लस घेतल्याने रोगांपासून संरक्षण होते, त्यामुळे नागरिकांना लस घेण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.
सर्वांनी लसीकरण करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन
जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणाचे फायदे सांगितले आहेत. सध्या वेगवेगळ्या 21 आजारांवर लस उपलब्ध आहे. लसीमुळे आजारांपासून संरक्षण मिळते, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या वीसहून अधिक आजारांची यादी व्हॅक्सिन वर्क या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली आहे. त्यामुळे लस घेण्यास घाबरु नका, कोणतेही गैरसमज बाळगू नका आणि लवकरात लवकर लसीकरण करावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
'या' 21 आजारांवर लस उपलब्ध
आतापर्यंत 21 आजारांवर लस उपलब्ध आहे. यामध्ये हेपीटायटीस बी (Hep B), गोवर (Measles), कांजण्या (Varicella), रुबेला (Rubella), गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer), पटकी/कॉलरा (Cholera), घटसर्प (Diphtheria), इबोला (Ebola), इन्फ्लुएंझा (Influenza), जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis), मेंदुज्वर (Meningitis), गालगुंड (Mumps), डांग्या खोकला (Pertussis), फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia), पोलिओ (Polio), रेबिज (Rabies), रोटा व्हायरस (Rotavirus), धनुर्वात (Tetanus), विषमज्वर (Typhoid), पीतज्वर (Yellow Fever) या रोगांपासून संरक्षण होणाऱ्या लसींचा समावेश आहे.
इतर बातम्या :
- Corona Vaccine : कोविन अॅपवर नोंदणीनंतरच मेडीकलमध्ये मिळणार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन
- WFH in Corona : वर्क फ्रॉम होमचं हवं! 82 टक्के लोकांना ऑफिसला परतायची इच्छा नाही, अभ्यासात उघड
- Health Tips : हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याचे अनेक फायदे, कर्करोग राहील दूर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha