Corona Vaccine : कोविन अॅपवर नोंदणीनंतरच मेडीकलमध्ये मिळणार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन
Corona Vaccine : कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) फक्त प्रौढांसाठी वापरण्यासाठी पूर्णपणे अधिकृत केले गेले आहेत आणि ते फक्त 'प्रोग्रामॅटिक सेटिंग' मध्ये वापरले जाऊ शकतात, याचा अर्थ तुम्हाला अजूनही या लसींसाठी कोविन (CoWin) अॅपवर नोंदणी करावी लागेल.
Corona Vaccine : कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) या कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन वापरासाठी अधिकृत वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळ लोटल्यावर, या दोन लसींना आता बाजारात विकण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यामुळे सरकारलाही कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवणे गरजेच आहे. प्रशासनाकडे शुक्रवारी सकाळपर्यंत 13 कोटींहून अधिक डोसचा साठा आहे. तुम्ही तुमच्या शेजारच्या केमिस्टकडून कोविड लस खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे.
कारण दोन्ही भारत-निर्मित लसींना बाजारात विक्रीसाठी काही अटी घालण्यात आल्य आहेत. पहिली अट अशी आहे की या लसींना फक्त प्रौढांसाठीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे (कोवॅक्सिन 15-18 वर्षांच्या वयोगटातील लोकांसाठी वापरता येऊ शकते, परंतु केवळ या वयोगटासाठी आपत्कालीन-वापराची परवानगी आहे) आणि दुसरी अट म्हणजे त्यांना या लसींसाठी 'प्रोग्रामेटिक सेटिंग' करावं लागणर आहे, याचा अर्थ CoWIN पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने गुरुवारी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड साठी बाजारात विक्रीसाठी मंजुरी दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले की, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी बाजारात विक्रीला परवानगी मिळाली आहे. लसींनी या परवानगीसाठी अर्ज केला होता. तज्ज्ञ समितीने दिलेली माहिती पाहता या लसी दोन अटींसह इतर औषधांप्रमाणे बाजारातून खरेदी करत येतील.'
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- India Corona Vaccination : लसीकरणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार, 75 टक्के प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण
- India Corona Vaccination : लसीकरणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार, 75 टक्के प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण
- Maharashtra Corona Update : राज्यात आज 27,971 रुग्णांची नोंद, 61 जणांचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha