Landslide in Colombia : कोलंबियात भूस्खलन, 14 हून अधिक लोकांचा मृत्यू, 35 जखमी
कोलंबियात भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 35 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Landslide in Colombia : कोलंबियामध्ये भूस्खलन झाले असून त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी सकाळी पश्चिम कोलंबियामधील एका शहरातील निवासी भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. त्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परेरा येथील रिसारल्डा येथे भूस्खलनानंतर एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसानही झाले आहे.
कोलंबियात 14 जणांचा मृत्यू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी सकाळी पश्चिम कोलंबियामधील एका शहरातील निवासी भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. त्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य 35 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परेरा नगरपालिकेच्या रिसारल्डा येथे भीषण भूस्खलनानंतर एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. अनेक घरांचे नुकसानही झाले आहे. परेरा मेयर कार्लोस माया यांनी सांगितले की भूस्खलनामुळे तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला. तसेच परिसरात पुन्हा दरड कोसळण्याचा धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला. अधिक जीवितहानी होऊ नये म्हणून त्यांनी लोकांना जागा रिकामी करण्याचे आवाहन केले आहे.
बचाव पथकांनी 60 हून अधिक घरे रिकामी केली
भूस्खलनामुळे बाधित झालेली बहुतांश घरे लाकडाची होती. बचाव पथकांनी 60 हून अधिक घरे रिकामी केली आहेत. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. भूस्खलनानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. भूस्खलनानंतर अनेक लोक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. कोलंबियामध्ये डोंगराळ प्रदेश, वारंवार मुसळधार पाऊस आणि घरांच्या निकृष्ट बांधकामामुळे भूस्खलन होणे सामान्य आहे. देशातील सर्वात अलीकडील मोठी भूस्खलन आपत्ती 2017 मध्ये मोकोआ शहरात घडली, जेव्हा 320 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला होता. परेरा मेयर कार्लोस माया यांनी सांगितले की भूस्खलनामुळे (रिसारल्डा) 14 लोकांचा मृत्यू असून इथल्या परिसरात पुन्हा दरड कोसळण्याचा धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला.
संबंधित बातम्या :
- ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha