Clash in Maldives Parliament : मालदीवच्या संसदेत राडा; सत्ताधारी-विरोधी पक्षातील खासदारांमध्ये फ्री-स्टाईल, पाहा व्हिडीओ
Clash in Maldives Parliament : मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
![Clash in Maldives Parliament : मालदीवच्या संसदेत राडा; सत्ताधारी-विरोधी पक्षातील खासदारांमध्ये फ्री-स्टाईल, पाहा व्हिडीओ Clash in Maldives Parliament between ruling party and opposition member of parliament video goes viral on social media Clash in Maldives Parliament : मालदीवच्या संसदेत राडा; सत्ताधारी-विरोधी पक्षातील खासदारांमध्ये फ्री-स्टाईल, पाहा व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/28/72a2700410f814248e49a436c6cf34601706453679695290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Clash in Maldives Parliament : मालदीवच्या संसदेत रविवारी, (28 जानेवारी) सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. संसदेतील या राड्यामुळे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू मंत्रिमंडळाच्या प्रस्तावावर होत असलेले मतदान स्थगित झाले.
'सन ऑनलाइन' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बोलावलेल्या विशेष सत्रादरम्यान ही हाणामारी झाली. वृत्तानुसार, पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) आणि मालदीवच्या प्रोग्रेसिव्ह पार्टीचे(पीपीएम) या पक्षाच्या सत्ताधारी खासदारांनी माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या नेतृत्वाखालील मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीच्या (एमडीपी) खासदारांना विरोध केला.
ކެނދިކުޅުދޫ ދާއިރާގެ މެމްބަރު އީސާގެ ފައިގައި ހިފައި ކަނޑިތީމު މެމްބަރު ޝަހީމް ވައްޓާލާ މަންޒަރު. އެމްޑީޕީ ދޫކޮށް ޕީއެންސީއާ ގުޅުނު ސަރުކާރުގެ މެމްބަރުން މަޖިލީހަށް ހުރަސް އެޅުމާއެކު ތަޅުމުގައި ހަމަނުޖެހުން އަންނަނީ ހިނގަމުން. pic.twitter.com/mnmzvYKsrO
— Adhadhu (@AdhadhuMV) January 28, 2024
व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अधाधू या वृत्तवाहिनीने या घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये एमडीपीचे खासदार इसा आणि पीएनसीचे खासदार अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम भांडताना दिसत आहेत. व्हिडीओ फुटेजनुसार, शाहीम यांनी इसा यांचा पाय पकडला, त्यामुळे ते जमिनीवर पडले आणि त्यानंतर इसाने शाहीमच्या मानेवर लाथ मारली आणि त्याचे केस ओढले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)