China On Terrorist Sajid Mir: पुन्हा एकदा दहशतवादाची चीनकडून पाठराखण, साजिद मीरविरोधात UN मध्ये 'वीटो'चा वापर
China On Terrorist Sajid Mir: संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारत आणि अमेरिकेने साजिद मीर या दशहतवाद्याविरोधात ठेवलेल्या प्रस्तावावर चीनने 'वीटो'चा अधिकार वापरला आहे.
China On Terrorist Sajid Mir: दहशतवाद्याच्या मुद्द्यावर चीनची भूमिका पुन्हा एकदा उघड झाली आहे. लष्कर-ए-तैय्यबचा दहशतवादी साजिद मीर (Sajid Mir) याला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या (Terrorist) यादीमध्ये टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेकडून ठेवण्यात आला. पण चीनने या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी वीटोचा अधिकार वापरला आहे. त्यामुळे अमेरिका आणि भारताचा हा प्रस्ताव चीनने थांबवला आहे. साजिद मीरवर अमेरिकेने पाच मिलियन डॉलरचे बक्षीस देखील घोषित केले आहे. मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यातील साजिद हा एक आरोपी आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनने साजिद मीरला संयुक्त राष्ट्रात दहशतवीद्यांच्या यादीत नाव टाकण्याचा प्रस्तावाला स्थगिती दिली होती. दरम्यान आता चीनने या विरोधीत वीटोचा अधिकार वापरत हा प्रस्ताव थांबवला आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावाला चीनने याआधीही अनेकदा विरोध दर्शवला आहे.
साजिद मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी
साजिद मीर हा दहशवादी मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील एक आरोपी आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तैय्यब या दहशतवादी संघटनेचा तो भाग आहे. या दहशवादी संघटनांनी 2008 साली हा दहशवादी कट मुंबईत रचला होता. त्यावेळी त्यांनी कामा रुग्णालय, कॅफे, रेल्वे स्थानक यांसारख्या अनेक जागांवर हल्ला केला होता. यामध्ये 170 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकेतील लोकांचा देखील मृत्यू झाला होता. तसेच साजिद 2008 आणि 2009 मध्ये डेन्मार्कमधील एका वृत्तवाहिन्यांमधील कर्मचाऱ्यांना मारण्याचा कट रचल्याचं म्हटलं जातं.
साजिदच्या विरोधात 21 एप्रिल 2011 रोजी युनाईटेड स्टेट्सच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अनेक करण्यात आले होते.परदेशी सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा कट रचणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अमेरिकेच्या बाहेर अमेरिकेतील नागरिकांची हत्या करणे, सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करणे असे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. अमेरिकेने 22 एप्रिल 2011 रोजी साजिद मिर विरोधात अटक वॉरंट देखील जारी केले होते.
वीटो अधिकार म्हणजे काय?
वीटो हा मूळचा लॅटीन शब्द असून त्याचा अर्थ मी परवानगी देत नाही' असा होतो. रोममध्ये निवडून आलेल्या काही अधिकाऱ्यांना प्राचीनकाळात हे अधिकार देण्यात आले होते. रोमन सरकाराची कोणतीही कृती किंवा प्रस्ताव थांबवण्यासाठी हे अधिकारी या अधिकाराचा वापर करत असत. तेव्हापासून एखादी गोष्ट थांबवण्यसाठी या शब्दाचा वापर करण्यात येऊ लागला.
सध्या सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य आहेत. त्यामध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या पाच देशांचा समावेश आहे. या देशांकडे वीटोचा अधिकार आहे. जर एखाद्या स्थायी सदस्याचा निर्णय मान्य नसेल तर, या यादीतील सदस्य वीटो या अधिकाराचा वापर करु शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Jammu Kashmir : पाकचा 'नापाक' इरादा... सुरक्षा दलांनी उधळला पाकिस्तानचा कट, 5 दहशतवाद्यांचा खात्मा