एक्स्प्लोर

पाकवरील सर्जिकल स्ट्राईकनंतर चीनचा तीळपापड, भारताला सबुरीचा सल्ला

'भारत आणि पाकिस्तान संयम बाळगतील अशी आशा आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सबुरी आवश्यक आहे' अशी भूमिका चीनकडून घेण्यात आली आहे.

बीजिंग : पाकिस्तानातील 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवादी कॅम्पवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन समर्थन दिलं जात आहे. मात्र चीनने भारताला सबुरीचा सल्ला दिला आहे. आंतरराष्ट्रीय सहयोगातून राजधानी दिल्लीहून दहशतवादाविरोधात लढाई सुरु ठेवावी, असा सल्ला चीनने दिला आहे. भारत आणि पाकिस्तान हे महत्त्वाचे दक्षिण आशियाई देश आहेत. दोघांमधील संबंध मधुर आणि सहकार्याचे राहणं उभय देशांसाठी हिताचं आहे. दक्षिण आशियात शांती आणि स्थैर्य टिकून राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचं मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी व्यक्त केलं. 'भारत आणि पाकिस्तान संयम बाळगतील अशी आशा आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सबुरी आवश्यक आहे' अशी भूमिका चीनकडून घेण्यात आली आहे. पाकिस्तान आणि चीनमधील सलोख्याचे संबंध सर्वांना परिचित आहेत. त्यातच भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे चीनने पाकची पाठराखण केल्याचं दिसत आहे. पाकिस्तानवर एअर स्ट्राईक भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात 'जैश ए मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर, धाकटा भाऊ मौलाना तल्हा सैफ आणि मेहुणा युसुफ अजहर यांचा खात्मा झाला आहे. या हल्ल्यात हिटलिस्टवर असणाऱ्या 25 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात बालाकोटमध्ये असलेले 'जैश ए मोहम्मद'चे 350 दहशतवादी ठार झाले आहेत. 325 दहशतवादी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई सेनेला यश आलं आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. विशेष म्हणजे हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली केला गेला. पंतप्रधान मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असा ठरला अॅक्शन प्लॅन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या हल्ल्याच्या वेळी अॅक्शन रुममध्ये उपस्थित होते. सूत्रांच्या मते दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना काही पर्याय दिले होते. लष्कर आणि वायुसेनेने एलओसीजवळ हवाई पाहणी केली. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन द्वारे दहशतवाद्यांच्या कॅम्पला निशाणा बनवण्यात आले. मुख्य हल्ला करताना सर्वप्रथम रिफ्युलर टॅंकद्वारे ट्रायल उड्डाण घेतले गेले. मुख्य हल्ला केला त्यावेळी वायुसेनेने लेजर गायडेड बॉम्बचा वापर केला. पुलवामाचा बदला : ऐकले नाही म्हणून ठोकले, परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईला दुजोरा   जैश आणखी हल्ल्याच्या तयारीत होता. अजहरवर कारवाई करण्याची अनेकदा मागणी केली. मात्र पाकने काही पावले उचलली नाहीत. काल रात्री भारतीय वायुदलाने बालकोटमधील जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. हा हल्ला ट्रेनिंग कॅम्पवरच केला. हा कॅम्प मौलाना युसूफ अझर चालवत होता. युसूफ अझर हा मसूद अझरचा मेहुणा होता, असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव म्हणाले. सैन्याने सामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget