एक्स्प्लोर

Xi Jinping : शी जिनपिंग यांची तिसर्‍यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी निवड, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाकडे पुन्हा सत्ता

Xi Jinping : चीनमध्ये पुन्हा एकदा शी जिनपिंग यांची राजवट प्रस्थापित झाली आहे. सीपीसीने शी जिनपिंग यांची पुढील अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.

Xi Jinping : कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे ( Communist Party of China Congress ) 20 वे अधिवेशन संपल्यानंतर शी जिनपिंग ( Xi Jinping )यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिनपिंग यांची सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. चीनमध्ये (China), या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्रपती असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चा कमांडर देखील असतो.

तीन दशके जुनी राजवट बदलली
जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्याने पक्षाची तीन दशके जुनी राजवटही मोडीत निघाली आहे. चीनमध्ये 1980 नंतर राष्ट्रपतीसारख्या सर्वोच्च पदावर 10 वर्षांच्या कार्यकाळाचा नियम करण्यात आला. मात्र, जिनपिंग यांना आणखी काही वर्षे सत्तेवर ठेवण्यासाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला. शी जिनपिंग हे सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. आपल्या नियुक्तीपूर्वीच शी जिनपिंग यांनी त्यांच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा चीनमध्ये सत्ता काबीज केली आहे. चीनमध्ये 20व्या CPC राष्ट्रीय काँग्रेसचा शनिवारी समारोप झाला, ज्यामध्ये 2,296 प्रतिनिधींनी 205 सदस्यीय केंद्रीय समितीची निवड करण्यात आली.

'पॉलिट ब्युरो' घेते राष्ट्रपतीं संदर्भातील निर्णय
जिनपिंग हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्यही आहेत. 25 सदस्यीय 'पॉलिट ब्युरो'कडून जिनपिंग यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणूनही निवड झाली. त्यांच्याकडे पुढील पाच वर्षांसाठी पक्ष आणि देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे पॉलिट ब्युरोमधून गायब होती
केंद्रीय समितीच्या सदस्यांच्या यादीतून अनेक नेत्यांची नावे वगळण्यात आली होती. यामध्ये ली किंग (67), नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष ली झांशु (72), चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सचे अध्यक्ष वांग यांग (67), माजी उपपंतप्रधान हान झेंग (67) यांचा समावेश आहे. हे सर्व नेते शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय स्थायी समितीचे सदस्य होते.

जिनपिंग यांच्या नावावर रेकॉर्ड
जिनपिंग या वर्षी सीपीसी प्रमुख आणि अध्यक्ष म्हणून 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. पक्षाचे संस्थापक माओ झेडोंग यांच्यानंतर तिसऱ्यांदा सत्तेवर असणारे ते पहिले चिनी नेते ठरले आहेत. माओ त्से तुंग यांनी सुमारे तीन दशके चीनवर राज्य केले. नवीन पद मिळणे म्हणजे जिनपिंग यांचाही माओप्रमाणे आयुष्यभर सत्तेत राहण्याचा मानस आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!NEET Exam Scam : 'माझा'च्या प्रतिनिधीला 'नीट'चा आरोपी गंगाधरक़डून धमकावण्याचा प्रयत्नMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Embed widget