China : लोकसंख्या घटल्याने चीन चिंतेत, लोकसंख्या वाढवण्यासाठी आणली नवी ऑफर, नवविवाहित जोडप्यांना 30 दिवसांची सुट्टी
China Population Crisis : घटत्या लोकसंख्येमुळे चीन चिंतेत आहे. लोकसंख्या वाढवण्यासाठी आता चीन सरकारने नवीन ऑफर आणली आहे.
China Population Crisis : सर्वाधिक लोकसंख्या (Population) असणारा देश चीन (China) सध्या घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहे. त्यामुळे चीन सरकार लोकसंख्या वाढीसाठी नवनवीन योजना आणि उपक्रम राबवताना दिसत आहे. आता चीनने घटत्या लोकसंख्येवर उपाय म्हणून नवीन ऑफर आणली आहे. चीनमधील तरुण पिढी लग्नाकडे पाठ फिरवत आहे. येथील तरुण लग्न करणं टाळत आहेत. यामुळे जन्मदर घसरला असून येत्या काळात चीनसाठी अनेक अडचणी वाढू शकतात. या समस्येला तोंड देण्यासाठी चीन सरकारने आणखी एक ऑफर आणली आहे.
घटत्या लोकसंख्येमुळे चीन चिंतेत
दिवसेंदिवस घटता जन्मदर आणि तरुणांची घटती लोकसंख्या यामुळे सध्या चीन सरकार खूपच चिंतेत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सरकार सातत्याने अनेक योजना आणत आहे. चीन अनेक वर्षांपासून घटत्या लोकसंख्येशी झगडत आहे. त्यामुळे सरकारकडून नागरिकांना विविध प्रकारच्या ऑफर लोकांना दिल्या जात आहेत, मात्र तरीही परिस्थिती सुधारताना दिसत नाहीय.
सरकारची नवीन ऑफर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीन सरकार आता नवविवाहित जोडप्यांना विशेष वैवाहिक रजा देत आहे. तसेच नवविवाहित जोडप्यांना 30 दिवसांची सुट्टीही देण्यात येतआहे. पीपल्स डेलीच्या बातमीनुसार, ही सुट्टी देण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की, अधिकाधिक तरुणांनी लग्न करावं आणि यामुळे देशातील प्रजनन दरही वाढेल.
चीनसमोर नवं आव्हान
घटती लोकसंख्या आणि कमी होत चाललेली तरुणांची संख्या यामुळे चीन सरकारसमोर आणखी एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. चीनमधील तरुण लग्न करणं टाळत आहेत. त्यांचे लग्न न झाल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यांना तोंड देण्यासाठी चीन सरकारने आणखी एक योजना आणली आहे. या अंतर्गत चीन सरकार तरुणांना लग्नासोबतच मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
China Birth Rate : चीनचा जन्मदर घसरला
चीनमध्ये 2022 सालात गेल्या साठ वर्षांतली सर्वात कमी लोकसंख्या नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी चीनचा राष्ट्रीय जन्मदर कमालीचा घटल्याचं दिसून आलं आणि या घसरत्या जन्मदरामुळे चीन सध्या म्हाताऱ्यांचा देश बनला आहे. चीनमध्ये 2022 मध्ये 95 लाख मुलांचा जन्म झाला होता. 2021 साली ही संख्या एक कोटी 62 लाख इतकी होती. 2022 साली चीनची लोकसंख्या 8 लाख 50 हजारांनी घटली आहे. 2021 साली चीनची लोकसंख्या 141 कोटी 26 लाख होती. तर 2022 साली लोकसंख्या कमी होऊन 141 कोटी 18 लाखांवर आली.
चीनमधील तरुणांची संख्या कमी झाल्याने याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. त्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला सध्या आपली लोकसंख्या वाढवायची आहे. त्यासाठी सरकार सातत्याने नवीन योजना राबवून जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
World Population: जगाची लोकसंख्या 800 कोटींपार, 2023 पर्यंत भारत चीनला मागे टाकणार, UN चा अहवाल