(Source: ECI/ABP News/ABP Majha)
China Earthquake : चीन हादरलं! चीन आणि तजाकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का, तीव्रता 6.8 रिश्टर स्केल
Earthquake In China: : चीन आणि तजाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 6.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.
Earthquake In China: तुर्की आणि सीरीयानंतर (Turkey Syria Earthquake) आज सकाळी चीन भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. चीन आणि तजाकिस्तानमध्ये (Tajikistan Earthquake) भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती समोर आली आहे.
#UPDATE A 6.8-magnitude earthquake has hit eastern Tajikistan, the US Geological Survey says.
— AFP News Agency (@AFP) February 23, 2023
The quake struck around 5:37 am local time at a depth of about 20.5 kilometres (12.7 miles). USGS estimates that "little or no population" will be exposed to landslides from the quake
चीनमध्ये गुरूवारी (23 फेब्रुवारी) सकाळी 8.37 च्या सुमारास तजाकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या झिजियांगमध्ये 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. तर तजाकिस्तानमध्ये देखील भूकंपाचे धक्के बसले असून भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी होती. चीनच्या मीडियाने चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्र (CENC) हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, उइगरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यूएस (US) जिऑलिजकल सर्वेनुसार तजाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार तजाकिस्तानमध्ये भूंकप आला. हा परिसर डोंगराळ आहे. भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारण या परिसरात मानवीवस्ती नाही. परंतु अद्याप चीनच्या (China Earhquake) स्थितीबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.
तुर्कीए आणि सीरियामध्ये मोठा भूकंप
6 फेब्रुवारी रोजी तुर्कीए आणि सीरियामध्ये (Turkey Syria Earthquake Updates) मोठा भूकंप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शॉक बसले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं. भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सीरियामध्ये बचावकार्य सुरू आहे. जगभरातून तुर्की आणि सीरियाला मदत दिली जात आहे. तुर्कीए आणि सीरियातील भूंकपग्रस्त शहर पुन्हा नव्याने उभी करण्याचे आव्हान तुर्कीए सरकारसमोर आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, दोन्ही देशातील शेकडो इमारती कोसळल्या होत्या. अनेकजणांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत. काहींची घरं जमीनदोस्त झाली तर अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. अशा इमारतींना धोकादायक इमारती म्हणून घोषीत केले होते. धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना रिलीफ कॅम्पमध्ये पाठवण्यात आले.
इतर महत्तवाच्या बातम्या :