तुम लढो... हम कपडे संभालते है! वरवर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चीनचा UN सुरक्षा परिषदेत चकार शब्दही नाही, चीनची अशीही फसवाफसवी
India Pakistan Tensions: पाकिस्तान एकीकडे चीनचा पाठिंबा असल्याचा ढोल वाजवत असताना दुसरीकडे चीनकडून राजनैतिक संबंधांसाठी फसवाफसवी सुरु असल्याचं दिसतंय.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात मोठ्या कारवाया करण्यास सुरुवात करत भारताने राजनैतिक संबंध तोडण्यासही सुरुवात केली आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व प्रकारचा व्यापार थांबवण्यात आला आहे. जगभरातील विविध देश भारताच्या बाजूने एकीकडे उभे राहिले आहेत. (Ind VS Pak) दुसरीकडे भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या भीतीने बिथरलेल्या पाकिस्तानने आपली अवस्था सांगण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली होती. बंद दाराआड झालेल्या बैठकीत पाकिस्तानचा 'मित्र' चीन ही उपस्थित होता. पाकिस्तानला जगातील देश देशांची सहानुभूती मिळेल असे वाटले मात्र प्रत्यक्षात उलटच घडल्याचे दिसले. (China)
भेटीचा नुसताच बहाणा, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीनने बाळगले मौन
या बैठकीत पहलगाम हल्ल्याबद्दल पाकिस्तानकडून तीव्र प्रश्न विचारण्यात आले. मात्र यात पाकिस्तानचा मित्र देशाची नाही त्यांच्यासोबत उभारल्याचे दिसून आले नाही. एकीकडे सोमवारी पाकिस्तानमधील चीनचे राजदूत झाओडोंग यांनी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली होती. या बैठकीदरम्यान दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी चीन पाकिस्तानला पाठिंबा देईल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण असं असलं तरी द्विपक्षीय बैठकांमध्ये पाकिस्तानला पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानमागे उभे राहण्याचे टाळताना चीन दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कोणत्याही देशाने पाकिस्तान बद्दल सहानुभूती व्यक्त केली नाही. विशेष म्हणजे यात चीनचाही सहभाग होता.
बंद दाराआड झालेल्या या बैठकीत सदस्य देशांनी पाकिस्तानकडून भारताबाबत पसरवल्या जाणाऱ्या खोट्या कथेला फेटाळून लावले. बैठकीदरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील काही देशांनी पाकिस्तानाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवर आणि भारताला देण्यात येणाऱ्या अण्वस्त्रांच्या धोक्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सदस्य देशांनी या कृतीला पाकिस्तानची प्रक्षोभक कृती असे म्हटले. या बैठकीनंतर कोणत्याही देशाने इतर कोणतेही विधान केले नाही किंवा कोणताही प्रस्ताव समोर आला नाही .
चीन माध्यमांमधून पाठिंब्याच्या बातम्या गायब
चीनच्या माध्यमांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या तणावाबाबत काही बातम्या आल्या आहेत .मात्र या बातम्यांमध्ये चीनने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याचा कुठेही उल्लेख नाही .पहलगाम हल्ल्यानंतर चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्रात काही वृत्त प्रकाशित केले आहेत .ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा उल्लेख आहे .ग्लोबल टाइम्सने एका लेखात ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डन चा हवाला देत म्हटले आहे की, 'काश्मीरमधील हल्ल्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान मधील तणाव तीव्रतेने वाढला आहे .या तणावामुळे संघर्षाची भीती निर्माण झाली आहे . '
ग्लोबल टाइम्स ने पुढे म्हटले आहे, AP टाइम्सच्या मते, भारताने ताबडतोब काश्मीर हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आणि पाकिस्तानला दोषी ठरवले .आणि म्हटले की या हल्ल्याचे सीमेपलीकडून संबंध आहेत .पाकिस्तानने या हल्ल्यात कोणताही सहभाग असल्याचे नाकारले आहे .
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हूआने ही पाकिस्तान आणि भारताच्या तणावावर काही वृत्त प्रकाशित केले आहेत .ज्यात एका लेखात भारत आणि पाकिस्तान मधील व्यापार बंद झाल्याचे वृत्त आहे .रविवार सहा मे रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालात या वृत्त संस्थेने लिहिले आहे की भारताने पाकिस्तान मधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी घातली .भारताचे असे म्हणणे आहे की हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकांच्या हितासाठी घेण्यात आला आहे . चीनचा पाठिंबा असल्याचं कोणतंही वृत्त नाही.
हेही वाचा:























