एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

China Covid Crisis: चीनमध्ये एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 3.7  कोटी रुग्ण, 18 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण

China Corona Updates: चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येने या आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून एकाच दिवसात 3.7 कोटी रुग्णांची भर पडल्याचं ब्लूमबर्गच्या अहवालात (Bloomberg report) म्हटलं आहे. 

बीजिंग: चीनमध्ये कोरोनाचा विळखा (China Covid Outbreak) दिवसेंदिवस आवळतच चालला असून एकाच दिवसात 3.7 कोटी कोरोना रुग्णांची भर पडल्याचं ब्लूमबर्गच्या अहवालात (Bloomberg report) म्हटलं आहे. ही रुग्णसंख्या जगभरातीस सर्वात मोठी असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 

चीनमध्ये आतापर्यंत 24.8 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असून ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के इतकी भरते. महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांमध्येचं कोरोनाच्या एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येची भर पडली आहे. बुधवारी झालेल्या चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अंतर्गत बैठकीत हा डेटा शेअर करण्यात आला, असे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटलं आहे.

China Covid Outbreak: चीनमध्ये औषधांचा तुटवडा 

चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने त्या ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. चीनमध्ये आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉलची सध्या जास्त मागणी आहे. तसेच देशातील रुग्णालयंही भरली जात असल्याची माहिती आहे. 

China Corona Deaths: रोज पाच हजार रुग्णांचा मृत्यू?

कोरोनासंबंधी अभ्यास करण्याऱ्या एका ब्रिटिश संस्थेने, एअरफिनिटीने त्याच्या अहवालात म्हटलं आहे की, चीनमध्ये दररोज 10 लाख रुग्णांची भर पडत असून पाच हजार रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. परंतु वास्तविक परिस्थिती त्याहून भीषण असून हा आकडा मोठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आधी जानेवारी महिन्यामध्ये चीनमध्ये दररोज सरासरी चार लाख रुग्णांची भर पडत होती. आताच्या रुग्णसंख्येने हा आकडा पार केला  असून चीनमधील कोरोनाची स्थिती ही अधिक बिकट होत चालली असल्याचं हे लक्षण आहे. 

India Corona Updates: भारतात सतर्कतेचे उपाय

चीनसह जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने भारतातही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. देशातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तर राज्यांनी सतर्क राहावं आणि कोरोनासंबंधित व्यवस्थापनेची सर्व तयारी पूर्ण करावी, मूलभूत आरोग्य व्यवस्था बळकट करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिले आहेत. आज त्यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ram Shinde on Ajit Pawar : निवडणुकीत आलेल्या अपयशापेक्षा  कट रचून पराभव केला गेला याचं दु:खBharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वासVijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget