(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Extramarital Affair: बायकोला फसवून विवाहबाह्य संबंध ठेवाल तर गमवाल नोकरी; जाणून घ्या नक्की कुठे आहे असा नियम?
China: एका चिनी कंपनीने मोठ्या ते लहानापर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विवाहबाह्य संबंधांवर बंदी घालण्याचा नियम जारी केला आहे. आता प्रश्न असा आहे की कंपनीने हा नियम का जारी केला? तर पाहा...
Extramarital Affair : जेव्हा तुम्ही एखादी कंपनी जॉईन करता तेव्हा कंपनी तिच्या काही पॉलिसी सांगते. या पॉलिसी अंतर्गत, तुम्हाला काही सुविधा देखील मिळतात आणि काही बंधनं देखील घातली जातात. कंपनीची पॉलिसी न पाळल्यास नोकरी गमावण्याचा धोका असतो. कंपनी तिच्या सर्व अटी आणि शर्ती सांगते आणि कंपनी जॉईन करताना कर्मचारीही या अटी मान्य करतात. काही वेळा काही अटी अगदी विचित्र असतात, जसे की विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) ठेवल्यास नोकरीतून काढून टाकले जाणे.
आजकाल बरेच जण हे आपल्या पत्नीशी लपवून विवाहबाह्य संबंध ठेवतात, काहीवेळा कंपनीतल्या कंपनीत, तर काहीवेळा कंपनीबाहेरील व्यक्तीसोबत संबंध ठेवले जातात. मात्र, आपल्या कंपनीत असे प्रकार घडू नये, असे एका चिनी कंपनीला वाटते आणि त्यामुळे या कंपनीने अजब नियम काढला आहे. विवाहबाह्य संबंध ठेवल्यास कर्मचाऱ्याला नोकरीतून काढून टाकले जाईल, असा नियम कंपनीने बनवला आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंब जोडले राहावे, या अनुषंगाने हा नियम काढण्यात आल्याचे कंपनी सांगते.
विवाहबाह्य संबंधांमुळे नोकरीला धोका
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने आपल्या रिपोर्टमध्ये एका विचित्र कंपनीबद्दल सांगितलं आहे. ही एक चिनी कंपनी आहे, जिने आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की, विवाहबाह्य संबंध ठेवल्यास त्यांना नोकरीतून काढलं जाईल. कंपनीने 9 जून रोजी आपल्या कर्मचाऱ्यांना या विचित्र नियमाबद्दल सांगितलं आहे.
कंपनीने हा नियम का काढला?
कंपनीने विवाहबाह्य संबंधांवर बंदी घालण्याचा हा नियम मोठ्या ते लहानापर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी जारी केला आहे. आता प्रश्न असा आहे की कंपनीने हा नियम का जारी केला? खरं तर, संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी विवाहबाह्य संबंधांवर बंदी घालण्याचा नियम लागू करण्यात आला आहे, असे कंपनीचे मत आहे. कंपनीच्या मते, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कुटुंबाशी एकनिष्ठ राहावे लागते. प्रत्येकाच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय या कंपनीने घटस्फोटावरही बंदी घातली आहे.
कर्मचाऱ्यांना हा बदल वाटला विचित्र
कंपनीला स्वतःचा नियम अधिक चांगला आणि सोईस्कर वाटला, पण दुसरीकडे कंपनीला हा नियम करण्याची गरज का पडली? हे कर्मचाऱ्यांना समजत नाही. कर्मचाऱ्यांना हा नियम विचित्र वाटतो आहे. कंपनीला असा नियम काढण्याची गरज नव्हती, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा:
Schools Closed: 'या' राज्यांमध्ये शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या पुन्हा वाढल्या, 'हे' आहे कारण?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI