Donald Trump : अमेरिकन संसद हल्ला प्रकरणात ट्रम्प दोषी, समितीचा अहवाल ; फौजदारी खटला चालवण्याची शिफारस
US Capitol Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवानंतर अमेरिकन संसद कॅपिटल हिलवर हल्ला केला होता.
![Donald Trump : अमेरिकन संसद हल्ला प्रकरणात ट्रम्प दोषी, समितीचा अहवाल ; फौजदारी खटला चालवण्याची शिफारस capitol riot case us house panel recommends criminal charges against donald trump in january 6 capitol riot case Donald Trump : अमेरिकन संसद हल्ला प्रकरणात ट्रम्प दोषी, समितीचा अहवाल ; फौजदारी खटला चालवण्याची शिफारस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/09/9207d44124edc26012667e0fa1167a011660014573227322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
America Capitol Riot Case : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कॅपिटल हिल हिंसाचार (US Capitol Riot) प्रकरणी चौकशी समितीने डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना दोषी ठरवत त्यांच्यावर खटला चालवण्याची शिफारस केली आहे. कॅपिटल हिल हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या समितीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालवण्याची शिफारस केली आहे. चौकशी समितीने या हल्ल्यासाठी ट्रम्प यांना जबाबदार धरलं आहे. आता ट्रम्प यांना दोषी ठरवून त्यांच्यावर खटला चालवायचा की नाही हे आता न्याय विभाग ठरवणार आहे. या शिफारशीमुळे ड्रम्प यांच्यावरील दबाव वाढला आहे.
ट्रम्प यांचं 2024 मध्ये निवडणूक लढण्याचं स्वप्न भंगणार
दरम्यान, यामुळे ट्रम्प यांचं 2024 मध्ये निवडणूक लढण्याच्या स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अमेरिकन संसदेवर हल्ला झाला होता. कॅपिटल हिल हल्ला प्रकरणाच्या चौकशी करणाऱ्या काँग्रेस कमिटी अर्थात संसदेच्या समितीने सोमवारी अहवाल न्याय विभागाकडे सोपवला आहे. यासोबतच समितीने ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत खटला चालवण्याचीही शिफारस केली आहे.
अमेरिकन संसद कॅपिटल हिलवर हल्ला
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर हल्ला केला होता. तेव्हापासून ट्रम्प अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर व्हाईट हाऊस सोडताना ट्रम्प यांनी अनेक सरकारी कागदपत्रसोबत नेले होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताना कागदपत्रांनी भरलेले 15 बॉक्स आपल्या सोबत नेले. ही कागदपत्रं फ्लोरिडामधील मार-ए-लागो रिसॉर्टमधून हस्तगत करण्यात आली होता. त्यानंतर आता पुन्हा येथे छापेमारी करण्यात आली आहे.
ट्रम्प केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर
डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहे. जानेवारी महिन्यात ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊसवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एफबीआयकडून तपास सुरु आहे. यामुळे ट्रम्प आणि ट्रम्प समर्थक तपास यंत्रणाच्या केंद्रस्थानी आहेत. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर व्हाईट हाऊस सोडताना ट्म्प यांनी अनेक सरकारी कागदपत्रसोबत नेल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
निकटवर्तीयांवर खटला चालवण्याचीही शिफारस
अमेरिकन संसदेत 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या हिंसाचार झाला. या घटनेसंदर्भात चौकशी टाळण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याआधी एक नवीन खेळी केली होती. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएस कॅपिटलवरील हल्ल्याची चौकशी करणार्या सदन समितीवर खटला दाखल केला होता. ट्रम्प यांनी समन्स टाळण्यासाठी हा खटला दाखल केला. दरम्यान, चौकशीदरम्यान ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)