UK Finance Minister Quits: ब्रिटनच्या आरोग्य आणि अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा, बोरिस जॉन्सन सरकार संकटात
UK Finance Minister Quits: ब्रिटनचे बोरिस जॉन्सन सरकार सध्या अडचणीत सापडले आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य सचिव साजिद जावेद यांनी राजीनामा दिला आहे.
UK Finance Minister Quits: ब्रिटनचे बोरिस जॉन्सन सरकार सध्या अडचणीत सापडले आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी राजीनामा दिला आहे. सुनक यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ऋषी सुनक यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सरकार योग्य, गांभीर्याने आणि सक्षमपणे चालवले जाईल, अशी जनतेची अपेक्षा असते. परंतु अनेकदा तसे होत नाही. मंत्री म्हणून ही माझी शेवटची नोकरी असू शकते परंतु मला विश्वास आहे की, या Standards लढले पाहिजे. यामुळेच मी पंतप्रधान बोरिस यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे.
The public rightly expect government to be conducted properly, competently and seriously.
— Rishi Sunak (@RishiSunak) July 5, 2022
I recognise this may be my last ministerial job, but I believe these standards are worth fighting for and that is why I am resigning.
My letter to the Prime Minister below. pic.twitter.com/vZ1APB1ik1
आरोग्य मंत्री साजिद जावेद म्हणाले की, 'मला हे सांगताना खेद वाटतो की तुमच्या नेतृत्वाखाली ही परिस्थिती बदलणार नाही आणि त्यामुळे तुम्ही माझा विश्वास गमावला आहे.' जॉन्सन सरकारच्या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सरकारला धोका निर्माण झाला असून आता पंतप्रधान बोरिस जॉन्सनही राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
दोन वर्षांनंतर चीनने सुरू केली आंतरराष्ट्रीय उड्डाणे, भारतासाठी विमानसेवा कधी होणार सुरू?
China : चीनमध्ये घर घेण्यासाठी अनोखी ऑफर! पैशांऐवजी कंपनी घेतेय चक्क टरबूज आणि लसूण, नेमकी ऑफर काय?
Chicago Shooting : शिकागो गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू, 59 जखमी; राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी व्यक्त केलं दु:ख