दोन वर्षांनंतर चीनने सुरू केली आंतरराष्ट्रीय उड्डाणे, भारतासाठी विमानसेवा कधी होणार सुरू?
India-China: दोन वर्षांच्या बंदीनंतर चीनने आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. कोविड-19 महामारीमुळे चीनने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदी घातली होती.
India-China Air Services: दोन वर्षांच्या बंदीनंतर चीनने आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांना ( International Flight) परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. कोविड-19 महामारीमुळे चीनने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदी घातली होती. चीनने गेल्या महिन्यात त्यांच्या देशात नोकरी करत असलेल्या भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी व्हिसा बंदी उठवली असली तरी, भारताला हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याचे कोणतेही संकेत चीनने दिलेले नाहीत. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनने इतर देशांतून येणाऱ्या लोकांसाठी ठरवून दिलेल्या हॉटेल्समधील क्वारंटाईनचा कालावधी सात दिवसांवर आणला आहे.
चीनच्या सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'च्या वृत्तानुसार, या निर्णयामुळे चीनला इतर देशांशी जोडणाऱ्या विमानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: चीनला अमेरिकेशी जोडणाऱ्या विमानांची संख्या लक्षणीय वाढली आहे. याशिवाय चीनमधून इतर देशांमध्ये जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
2020 पासून भारत आणि चीन दरम्यान नियमित उड्डाणे बंद आहे
ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला 2,025 प्रवासी उड्डाणे पुन्हा सुरू होणार आहेत. वृत्तानुसार असेही म्हटले आहे की, नोव्हेंबर 2020 पासून चीन आणि भारत यांच्यात कोणतेही नियमित उड्डाण झाले नाही आणि आतापर्यंत दोन्ही देशांदरम्यान कोणतीही फ्लाइट अधिसूचित केलेली नाही.
चीनने दोन वर्षांची व्हिसा बंदी उठवली
दोन वर्षांपासून भारतात अडकलेल्या चीनच्या विविध शहरांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांसाठी चीनने गेल्या महिन्यात दोन वर्षांची व्हिसा बंदी उठवली आहे. परंतु या कर्मचाऱ्यांचे चीनमध्ये जाणे खूप अवघड आहे. कारण सध्या दोन्ही देशांदरम्यान कोणतीही विमानसेवा सुरू नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
आजच्याच दिवशी झाला होता वैज्ञानिक चमत्कार, क्लोनिंगद्वारे झाला मेंढीचा जन्म
China : चीनमध्ये घर घेण्यासाठी अनोखी ऑफर! पैशांऐवजी कंपनी घेतेय चक्क टरबूज आणि लसूण, नेमकी ऑफर काय?
Chicago Shooting : शिकागो गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू, 59 जखमी; राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी व्यक्त केलं दु:ख