Paris Shooting: पॅरिसमध्ये अंदाधुंद गोळीबार, दोन ठार तर अनेकजण जखमी, गोळीबार करणाऱ्यास अटक
गोळीबार करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून यामागे कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तूर्तास या ठिकाणापासून नागरिकांनी दूर रहावं असं पोलिसानी आवाहन केलं आहे.
Paris Shooting: पॅरिस शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी आज अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त आहे. एफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार (Paris Shooting) करणाऱ्या वक्तीला पॅरिस पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार घडलेल्या ठिकाणापासून नागरिकांनी दूर रहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
पॅरिस शहराच्या रु डी'एनघेईन (Rue d’Enghien) या मध्यभागी असलेल्या ठिकाणी हा गोळीबार घडला आहे. या गोळीबाराच्या मागचे नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुरवातीला हा दहशतवादी हल्ला असल्याचं पोलिसांना संशय होता. त्या दृष्टीने पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
मेट्रो स्टेशनपासून जवळ असलेल्या कुर्दिश सांस्कृतिक केंद्राजवळ ही गोळीबाराची घटना घडली. मेट्रो स्टेशन जवळील रस्त्यावर अनेक रेस्टॉरंट्स आणि दुकाने तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी देशातील आणि विदेशातील पर्यंटकांची नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी 69 वर्षाच्या संशयिताला पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं आहे.
Shooting in central Paris, several injured, reports AFP quoting police source.
— ANI (@ANI) December 23, 2022
एका दुकानदाराने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि त्यानंतर या परिसरात मोठा गोंधळ माजला. आम्ही सगळ्यांनी दरवाजे बंद केले.
गोळीबारात जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हल्ल्यात वापरलेले शस्त्र जप्त केले अशी माहिती आहे. गोळीारात जखमी झालेल्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Paris: French media reports at least 2 dead in a shooting in the 10th arrondissement. There are some reports the perpetrator - a man in his 60s - targeted a Kurdish cultural centre on rue D’Enghien.
— Holly Johnston (@h0llyjohnston) December 23, 2022
pic.twitter.com/yVxZqKQ72E
ही बातमी वाचा:
- China Covid Crisis: चीनमध्ये एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 3.7 कोटी रुग्ण, 18 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण