एक्स्प्लोर
Advertisement
सीईओचा दिलदारपणा, स्वत:चा पगार घटवला, कर्मचाऱ्यांचा वाढवला!
मुंबई : जर तुम्हाला एखाद्याचे मनापासून आभार मानायचे असतील तर तुम्ही अनेक मार्ग अवलंबता, खरंय ना. काही जण शब्दांनी आभार मानतात तर काही जण स्पेशल करतात. अमेरिकेतील 'ग्रॅव्हिटी पेमेंट्स' या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सीईओ डॅन प्राईसचे आभार मानण्यासाठी असंच काहीतरी स्पेशल केलं.
कर्मचाऱ्यांनी त्यांचा 6 महिन्यांचा पगार साठवला आणि सीईओला 'तेसला मॉडेल एस' (Tesla Model S) ही लॅव्हिश कार भेट म्हणून दिली. तुम्हाचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. कर्मचाऱ्यांनी सीईओला महागडी कार गिफ्ट का दिली, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. याचं कारण म्हणजे डॅन प्राईसने कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला होता आणि त्याचे आभार मानण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केलेला हा खटाटोप.
डॅन प्राईसने सर्व कर्मचाऱ्यांचा कमीतकमी पगार तब्बल 70 हजार डॉलरपर्यंत (46,96,650 रुपये) वाढवला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कारण त्यांचा पगार अक्षरश: दुप्पट झाला होता. बरं एवढ्यावरच डॅन थांबला नाही, त्याने स्वत:चा पगार 1.1 मिलियन डॉलरवरुन (7,38,09,945 रुपये) सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणेच 70 हजार डॉलर करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
सीईओच्या या निर्णयामुळे 'ग्रॅव्हिटी पेमेंट्स'च्या भारावलेल्या कर्मचाऱ्यांनी डॅन प्राईसला सरप्राईज देण्याचं ठरवलं. सर्व 120 कर्मचाऱ्यांनी सीईओला नवी कोरी 'तेसला मॉडेल एस' ही त्याची ड्रीम कार भेट म्हणून दिली. तेसला मॉडेल एस' या कारची किंमतच मुळात 70 हजार डॉलर आहे. स्वत: डॅन प्राईसने ही आनंदाची बातमी फेसबुकवर शेअर केली.
सीईओ डॅन प्राईसला त्याची ड्रीम कार गिफ्ट म्हणून देण्याची कल्पना 24 वर्षांची सिंगल मदर असलेल्या अलिसा ओ'नीलची होती. सिंगल मदर असल्याने पगारवाढीचा निर्णय तिच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. कर्मचाऱ्यांनी डॅनला कार गिफ्ट केल्यानंतर त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ 'ग्रॅव्हिटी पेमेंट्स'ने यू ट्यूबवर शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement