US Sanctions On Russia : अमेरिकेनं रशियावर पुन्हा घातले निर्बंध, लष्करी अधिकाऱ्यांसह नागरिकांवर बंदी
अमेरिकेने रशियाच्या एक हजार लोकांवर बंदी घातली आहे. यामध्ये रशियन लष्कराचे सदस्य, बेलारूसी लष्करी अधिकारी आणि अनेक रशियन नागरिकांचा समावेश आहे.
US Sanctions On Russia : गेल्या सहा महिन्याहून अधिक काळ झालं रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. अद्याप तेथील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. अशातच अमेरिका (America) रशियावर सातत्याने निर्बंध जाहीर करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनच्या (Ukraine) ताब्यातील प्रदेशांसाठी करार केला आहे. रशियाच्या या कारवाईविरोधात अमेरिकेने लगेच रशियावर निर्बंध लादले आहेत. युक्रेनने सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करावा, असे देकील अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच अमेरिकेने रशियाच्या एक हजार लोकांवर बंदी घातली आहे. यामध्ये रशियन लष्कराचे सदस्य, बेलारूसी लष्करी अधिकारी आणि अनेक रशियन नागरिकांचा समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन प्रशासन सातत्यानं रशियावर नवीन-नवीन निर्बंध घालत आहेत.आता पुन्हा नवीन निर्बंध जाहीर केले आहे. अमेरिकेच्या एक हजार नागरिकांवर रशिया प्रशासनानं बंदी घातली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या ताब्यातील प्रदेशांसाठी करार केला आहे. याविरोधात अमेरिका आक्रमक झाली आहे. रशियाने केलेल्या कराराला युक्रेनच्या जनतेसह पाश्चात्य अधिकाऱ्यांनी रशियाचा बेकायदेशीर दावा असल्याचे म्हटले आहे. बिडेन प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेझरी आणि वाणिज्य विभागांनी रशियाच्या आत किंवा बाहेरील संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध जाहीर केले आहेत. जे रशियाला त्याच्या कथित संलग्नीकरणासाठी राजकीय किंवा आर्थिक मदत देतात. यूएस ट्रेझरीने रशियाच्या लष्करी-औद्योगिक संकुलातील 14 जणांनी आणि रशियाच्या विधिमंडळाच्या 278 सदस्यांनी युक्रेनमध्ये बनावट सार्वमत लागू करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अमेरिकेनं म्हटलं आहे.
लष्करी अधिकाऱ्यांसह नागरिकांवर बंदी घालण्यात आली
अमेरिकेनं रशियाच्या 1000 व्यक्तींवर व्हिसा निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिसावर बंदी घालण्यात आलेल्यांमध्ये रशियन फेडरेशनचे लष्करी सदस्य, बेलारशियन लष्करी अधिकारी आणि रशियासाठी पडद्याआडून काम करणारे काही रशियन गुप्त अधिकारी, तसेच अनेक रशियन नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने युक्रेनच्या युद्धकैद्याविरुद्ध मानवी हक्कांचे घोर उल्लंघन केल्याच्या निषेधार्थ हे निर्बंध लादल्याची माहिती यूएस स्टेट डिपार्टमेंटने एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी राष्ट्राला संबोधित करत असताना रशियावर नवीन निर्बंध घालत असल्याची घोषणा केली होती. यामध्ये त्यांनी रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका? ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता, सरकारकडून तयारी सुरु
- Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण, युक्रेनचे 9 तर रशियाचे 15 हजार सैनिकांचा मृत्यू, आतापर्यंत काय काय घडलं?