एक्स्प्लोर
डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!
भारत आणि चीन यांच्यात वादाचं केंद्र असलेला डोकलाम भागावरुन भूतानने चीनला तोंडावर पाडलं आहे.
थिंपू: भारत आणि चीन यांच्यात वादाचं केंद्र असलेला डोकलाम भागावरुन भूतानने चीनला तोंडावर पाडलं आहे.
डोकलाम हा तुमचा नाही तर आमचा भाग आहे, असं भूतानने म्हटलं आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही दिवसापूर्वी डोकलाम हा आपलाच भाग असून, भूताननंही मान्य केल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज भूताननं चीनला हे प्रत्युत्तर दिलं आहे.
भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’
चीननं या भागात रस्ता निर्मिती करणं हे 1988 आणि 1998 च्या कराराचं उल्लंघन असल्याचंही भूतानने म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसात डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर भूताननं आपली बाजू स्पष्ट केल्यामुळे भारतालाही दिलासा मिळणार आहे.
भूतानने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, 16 जून 2017 रोजी चीनी सैन्याने डोकलाम भागात रस्त्याचं काम सुरु केलं. मात्र चीनकडून 1988 आणि 1998 च्या सीमासुरक्षा कराराचं उल्लंघन होत आहे.
दरम्यान, चीन सातत्याने डोकलाम हा आपलाच भाग असल्याचा दावा करत आहे. मात्र त्याला भूतानची पुष्टी नव्हती. पण भूताननेही मान्य केल्याचा खोटारडेपणा चीनने माध्यमांसमोर व्यक्त केला होता. आता भूतानच्या दाव्यामुळे चीन चांगलंच तोंडावर आपटलं आहे.
वादाची सुरुवात
चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, त्यानंतर दोन्ही देशातील सैन्यात तणाव वाढला.
संबंधित बातम्या
भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’
युद्धासाठी तयार राहा, चीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश
आमच्या लष्कराला हरवणं अशक्य, चिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती
भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’
बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी
…तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया
चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी
G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र
चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर
सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा
…अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी
हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement