Bernard Arnault : ना बेझोस ना इलॉन मस्क, आता बर्नार्ड अॅरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Forbes Real Time Billionaires List : फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या यादीत आता फ्रान्सच्या बर्नार्ड अॅरनॉल्ट याने इलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांना मागे टाकत सर्वाधिक श्रीमंत होण्याचा मान पटकावला आहे.
Bernard Arnault : लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्टने आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली असून त्यामध्ये बर्नार्ड अॅरनॉल्टने अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत हे स्थान पटकावलं आहे.
फ्रान्सच्या LVMH या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती आता 198.9 अब्ज डॉलर्स इतकी असून जेफ बेझोस या यादीत 194.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर इलॉन मस्कचा नंबर लागत असून त्याची संपत्ती ही 185.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. गेल्या आठवड्यात अमेझॉनच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घट झाली. जेफ बेझोस याने एकाच दिवसात जवळपास 14 अब्ज डॉलरची संपत्ती गमावली होती. त्याचा फायदा बर्नार्ड अॅरनॉल्टला झाला असून तो थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
बर्नार्ड अॅरनॉल्ट यांनी 1984 साली लग्जरी गुड्स मार्केटमध्ये पाऊल टाकलं होतं. कोरोनाच्या काळात बर्नार्ड अॅरनॉल्टच्या लुईस विटन या लग्जरी ब्रॅन्डचा खप मोठ्या प्रमाणात झाला आहे. या काळात बर्नार्ड अॅरनॉल्टच्या कंपनीचा महसूल हा 17.4 अब्ज डॉलर्सनी वाढला. कोरोनाच्या पूर्व काळाशी तुलना करता ही वाढ 14 टक्क्याहून अधिक आहे.
Bernard Arnault, Chairman and CEO of Louis Vuitton, Moët Hennessy, has overtaken Amazon founder Jeff Bezos as the world’s richest man, according to Forbes real time billionaires list.
— Hlokomelo Mabogale (@HlokiMabogale) August 4, 2021
The French national is said to be worth an estimated $199 billion.https://t.co/qoK8KxJDlS pic.twitter.com/4dAhEValVO
महत्वाच्या बातम्या :
- Tokyo Olympics : भारताच्या लेकींचं पराभवानंतरही कौतुक, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून महिला हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव
- Bajrang Punia Wins Quarter Final: बजरंग पूनिया सेमीफायनलमध्ये, क्वार्टर फायनलमध्ये इराणच्या पैलवानाला दाखवलं आस्मान
- Tokyo Olympics Women's Hockey: पोरी हरल्या पण मनं जिंकली... भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदक हुकलं, ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव