एक्स्प्लोर
Barcelona Terror Attack: ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, 13 ठार
बार्सिलोना शहरात मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
बार्सिलोना: स्पेनमधील बार्सिलोना शहरात मोठा दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी बॉम्ब किंवा बंदुकांचा वापर केलेला नाही, तर एक व्हॅन थेट गर्दीत घुसवली.
यामध्ये तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. नेहमीच गजबलेल्या लास रमब्लास या परिसरात हा हल्ला झाला.
पोलिसांनीही चार संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्याची जबाबदारी आयसीसने स्वीकारली आहे.
यापूर्वी फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीत अशा पद्धतीचे हल्ले झाले होते. त्यात आता स्पेनचीही भर पडली आहे.
दोन संशयित अटकेत
या हल्ल्यानंतर बार्सिलोनात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. ड्रिस ओउकाबीर असं त्यापैकी एकाचं नाव आहे.
हल्ल्यानंतर पोलिसांच्या व्हॅनला धडक
या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस शहराची नाकेबंदी करत होते, त्यावेळी एक व्हॅन बॅरिकेट तोडून पळून गेली. यादरम्यान त्यांनी दोन पोलिसांना जखमी केलं. मात्र ही व्हॅन दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सहभागी होती की नाही, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र पुढे ती व्हॅन पकडण्यात आली.
जखमींमध्ये भारतीयांचा समावेश नाही
दरम्यान या हल्ल्यात अनेक परदेशी नागरिक जखमी किंवा मृत झाल्याची शक्यता आहे. मात्र त्यामध्ये कोणत्याही भारतीयाचा समावेश नसल्याची माहिती मिळत आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपण स्पेनमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
गजबजलेलं ठिकाण
लास रमब्लास हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. इथे मोठ्या प्रमाणात दुकानं आणि हॉटेल्स आहेत. त्यामुळे इथे पर्यटकांची वर्दळ असते. याशिवाय इथे विविध कलाकारही आपल्या कला सादर करत असतात. त्यामुळे हे ठिकाण अगदीच गजबजलेलं असतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement