पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार, कट्टरपंथियांकडून हिंदू मंदिरावर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) बांगलादेश (Bangladesh) दौऱ्यानंतर त्या देशात हिंसा भडकली असून त्यात आतापर्यंत 11 जणांचा बळी गेल्याचं वृत्त रॉयटरने दिलं आहे.
![पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार, कट्टरपंथियांकडून हिंदू मंदिरावर हल्ला Bangladesh violence spreads after PM Modis visit attacks on Hindu temples trains पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार, कट्टरपंथियांकडून हिंदू मंदिरावर हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/29/e4c6f04a6d79a8f0e9963fb21fce80fb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसाच्या बांगलादेशच्या दौऱ्यानंतर त्या देशात हिंसा भडकली असून शेकडो कट्टरवाद्यांनी हिंदू मंदिरावर हल्ला केल्याचं वृत्त आहे. पूर्व बांगलादेशातल्या रेल्वे गाडीवर आणि मंदिरावर हा हल्ला करण्यात आला असून सुरक्षा रक्षकांनी हिंसेखोरांवर कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.
स्थानिक पोलीसांनी सांगितल्याप्रमाणे, गेली दोन दिवस सुरु असलेल्या या हिंसाचारात किमान 11 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय असं रॉयटरने आपल्या वृत्तात सांगितलं आहे. नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध म्हणून काही इस्लामिक कट्टरवाद्यांनी ही हिंसा घडवून आणली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बांगलादेशच्या दौऱ्यावर पोहोचले. बांगलादेश या वर्षी त्या देशाच्या 50 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. तसेच हेच वर्ष वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत आहे. तसेच या वर्षी भारत आणि बांग्लादेशच्या संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी बांग्लादेशची निवड केली होती.
रविवारी पंतप्रधानांचा दौरा संपला. त्यावेळी भारताने बांगलादेशला कोरोना लसीचे एक कोटी 20 लाख डोस भेट म्हणून देण्यात आले.
बांगलादेशातील इस्लामिक कट्टरवादी गटाचं म्हणणं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात मुस्लिम लोकांशी भेदभाव करतात. त्यावरुन त्यांनी मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध केला होता.
सुरक्षा रक्षकांनी या हिंसेखोरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व भागातील रेल्वे गाड्यांसोबत हिंदू मंदिरावर या कट्टरवाद्यांनी हल्ला केला. तसेच या परिसरातील सरकारी कार्यालयातील कागदपत्रेही पेटवण्यात आली. ढाक्यातील अनेक रस्ते या हिंसेखोरांनी बंद केले.
महत्वाच्या बातम्या :
- Myanmar coup: म्यानमारमध्ये रक्तरंजित रविवार, लष्करशाहीविरोधात प्रदर्शन करणाऱ्या 114 हून अधिक लोकांना मारण्यात आल्याचे वृत्त
- Suez Canal | कार्गो शिपने केला सुएज कालवा 'ब्लॉक', जगाचं तासाला 2800 कोटी रुपयांचं नुकसान
- दुबईचे दुसऱ्या क्रमांकाचे शासक शेख हमदान बिन राशिद यांचं निधन, दुबईच्या विकासात महत्वपूर्ण योगदान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)