एक्स्प्लोर
तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत पुन्हा शीख तरुणीशी गैरवर्तन
न्यूयॉर्क : अमेरिकेत वर्णभेदातून भारतीयांच्या हत्या आणि धमक्यांचे सत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. न्यूजर्सीमध्ये गुरुवारी एका भारतीय वंशाच्या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची तिच्या सात वर्षाच्या मुलासोबत निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी समोर आली. त्यातच आणखी एक घटना समोर आली असून, या घटनेत एका शीख तरुणीला आपल्या देशातून चालती होण्याची धमकी मिळाली आहे.
न्यूयॉर्कमध्ये राहणारी राजप्रीत एअर नावाच्या तरुणीला, “तू या देशाची नाहीस, तुझा या देशाशी काही संबंध नाही, तुझ्या देशात परत जा,” अशी धमकी एका अमेरिकन नागरिकानं दिली आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तानुसार, धमकी देणाऱ्या आरोपीला राजप्रीत मध्यपूर्व अशियातील असल्याचे वाटल्याने, त्याने तिच्याशी गैरवर्तन केल्याचं म्हणलं आहे.
या वृत्तानुसार, राजप्रीत आपल्या एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी सबवे ट्रेनने प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान एक अमेरिकन नागरिकाने राजप्रीतवर जोरजोरात ओरडून आपल्या देशात परत जा, अशी धमकी दिली. राजप्रीतने या घटनेचा व्हिडिओ न्यूयॉर्क टाईम्सच्या ‘धिस वीक इन हेड’ या सेक्शनवर पोस्ट केला आहे. न्यूयॉर्क टाईम्सचा हा सेक्शन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकेत सुरु असलेल्या वर्णभेदाच्या प्रकरणांना समोर आणण्यासाठी सुरु केला आहे.
या व्हिडिओद्वारे राजप्रीतने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासात ती फोनवर बोलत होती. त्यावेळी एक अमेरिकन नागरिक तिच्या जवळ आला, आणि जोरजोराने तिला उद्देशून बोलू लागला. तसेच जाताना शेवटी लेबेनानमध्ये परत जा, असंही तो यावेळी म्हणाला. यावेळी त्याने राजप्रीतला अपशब्दही वापरल्याचं तिचं म्हणणं आहे. राजप्रीत पुढे सांगते की, तिचा जन्म लेबेनानहून 30 किमी दूर अंतरावर झाला. पण तो भाग लेबेनानचा नसून, इंडियाना स्टेटच्या लेबेनान शहराचा आहे.
न्यूयॉर्क टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सबवे ट्रेनमधील वर्णभेदाचे वाढते प्रकार चिंतेचा विषय बनत आहेत. यापूर्वीही न्यूयॉर्कच्या सबवे ट्रेनमध्ये एक भारतीय वंशाच्या महिलेशी गैरवर्तन करण्यात आले होते. यावेळी या महिलेने याचा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला होता.
संबंधित बातम्या
भारतीय महिला अभियंत्यासह लेकाची अमेरिकेत निर्घृण हत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement