एक्स्प्लोर

आज इम्रान खान सरकारची संसदेत कसोटी! भाषणात भारताचं कौतुक, म्हणाले, भारत एक स्वाभिमानी देश...

पाकिस्तानमध्ये इम्रान खान (Imran Khan) यांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीबाबत आज अंतिम फैसला होणार आहे. इम्रान खान यांनी काल देशवासियांना संबोधित केलं. या भाषणात त्यांनी भारताचं कौतुक केलं.

Pakistan News : पाकिस्तानमध्ये इम्रान खान (Imran Khan) यांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीबाबत आज अंतिम फैसला होणार आहे. इम्रान खान यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होईल. सकाळी 11 वाजेपासून पाकिस्तानच्या संसदेच्या कामाला सुरुवात होईल. त्यामध्ये इम्रान खान यांना पायउतार करण्यासाठी 342 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात विरोधकांना 172 मतांची अवश्यकता आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं उपसभापती कासिम सूरी यांनी सभागृहात अविश्वास प्रस्ताव फेटाळल्याचा निर्णय रद्द करून तो निर्णय  घटनाबाह्य ठरवला. त्यामुळे इम्रान खान यांना मोठा झटका बसला होता. आपल्या पदावरुन हटवण्यासाठी काही परकीय देश प्रयत्न करत असल्याचा आरोपही काही दिवसांपूर्वी इम्रान यांनी केला होता. दरम्यान आजच्या अविश्वास ठारावर इम्रान खान यांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीचं भविष्य अवलंबून असले. 

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल देशवासियांना संबोधित केलं. या भाषणात त्यांनी भारताचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, मी भारतातील लोकांना इतरांपेक्षा अधिक जाणतो. मला वाईट वाटतंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि काश्मीरमधील परिस्थितीच्या कारणामुळे संबंध बिघडले. भारताबाबत काही बोलण्यास कुणाची हिंमत नाही. कुणा परदेशी ताकदीची हिंमत नाहीय की, भारताच्या परराष्ट्रीय धोरणात हस्तक्षेप करेल. भारत एक स्वाभिमानी देश आहे, असं इम्रान म्हणाले.  

इम्रान खान म्हणाले की, भारताचं परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून, दबावाकडे दुर्लक्ष करून भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, असं ते म्हणाले. 

त्यांनी शांततेचं आवाहन करताना म्हटलं की, रविवारी नमाजानंतर सर्वांनी बाहेर पडा आणि शांततेनं आंदोलन करा. या निदर्शनांदरम्यान तोडफोड करायची नाही. तुम्ही दाखवून द्यायचं आहे की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बाहेर पडला आहात. हे जे बाहेरील लोक कट रचून नाटकबाजी करतायेत, त्यांचा तुम्ही विरोध केला पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. यामुळे कळेल की पाकिस्तान हे एक जिवंत राष्ट्र आहे. इतिहास कधीच माफ करू शकत नाही. कोण काय भूमिका घेतोय, याची दखल इतिहास घेतो, असं ते म्हणाले. 

भारत इतका आवडतो तर तिकडेच जा- मरियम नवाज शरीफ
इमरान खान यांनी भारताचं कौतुक केल्यानंतर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. मरियम नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे की, खुर्ची जात असल्याचं दिसत असल्यानं हा व्यक्ती वेडा झालाय. भारत तुम्हाला जर एवढाच आवडतो तर पाकिस्तान सोडून भारतात जाऊन राहावं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभाEknath Shinde Meeting : कोल्हापूरसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा बैठक, घाटगेंसोबत चर्चाSanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यताUjjwal Nikam  Mumbadevi :  उज्जवल निकम मुंबा देवीच्या दर्शनाला : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
IPL 2024 DC vs MI: रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
Embed widget