(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Joe Biden : ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
Joe Biden : रिपब्लिकन उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध पहिल्या जाहीर चर्चेत राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या अत्यंत निराशाजनक कामगिरीमुळे सुद्धा अडचणी वाढल्या आहेत.
United States President Joe Biden : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (United States President Joe Biden) यांना आगामी निवडणुकीच्या रिंगणात मुकाबला करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याच पक्षातून दबाव वाढला आहे. एका डेमोक्रॅटिक खासदाराने त्यांना प्रथमच पुन्हा निवडणूक डिबेट थांबवण्याचे जाहीरपणे आवाहन केले आहे.
निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचे आवाहन
रिपब्लिकन उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध पहिल्या जाहीर चर्चेत राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या अत्यंत निराशाजनक कामगिरीमुळे सुद्धा अडचणी वाढल्या आहेत. 81 वर्षीय बिडेन हे अडखळताना दिसून आले. लॉयड डॉगेट यांनी जाहीरपणे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचे आवाहन केलं आहे.
दरम्यान, डेमोक्रॅट पक्षाचे नेते गेल्या काही दिवसांपासून बिडेन यांच्या फिटनेसबद्दल खाजगीरित्या चिंता व्यक्त करत आहेत, तर सार्वजनिक टिप्पण्यांमुळे त्यांच्या निवडक्षमतेबद्दल शंका दूर करण्यासाठी दबाव वाढला आहे. दुसरीकडे, व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार बिडेन येत्या काही दिवसांत त्यांच्या फिटनेसबद्दल असलेली चिंता दूर करण्यासाठी अनेक बैठका घेणार आहेत. त्यामध्ये एक न्यूज कॉन्फरन्सआणि महिन्याभरात त्यांची पहिली टेलिव्हिजन मुलाखत आहे.
कमला हॅरिस डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात प्रबळ दावेदार
दरम्यान, बिडेन यांच्यावर दबाव वाढला असतानाच अमेरिकेच्या उप-राष्ट्रपती अनिवासी भारतीय कमला हॅरिस नोव्हेंबरमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात प्रबळ दावेदार म्हणून समोर आल्या आहेत. CNN सर्वेक्षणामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे. 27 जून रोजी अटलांटात झालेल्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेत बिडेन यांच्या खराब कामगिरीनंतर कमला हॅरिस यांना वाढता पाठिंबा आहे.
कमला हॅरिस जवळजवळ ट्रम्प यांच्या नजीक पोहोचल्या आहेत. 47 टक्के नोंदणीकृत मतदारांनी ट्रम्प यांना समर्थन दिले आहे आणि 45 टक्के हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. हा पोल एरर मार्जिनमध्ये आहे, अशा परिस्थितीत कोणताही स्पष्ट नेता सुचवत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या