(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इम्रान खान यांच्या आरोपात तथ्य नाही, अमेरिकेचे पाकिस्तानला उत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केलेल्या आरोपांना अमेरिकेने उत्तर दिले आहे.
America : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आली आहे. बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांना लवकरच पदावरून हटवले जाऊ शकते. दरम्यान, इम्रान खान यांनी आज देशाला संबोधित केले. यामध्ये त्यांनी आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी आपल्या विरोधात कट रचला जात असल्याचा आरोप केला असून अमेरिकेकडे लक्ष वेधताना इम्रान कान यांनी म्हटले की, अमेरिककडून मिळालेले धमकीचे पत्र माझ्याविरोधात असून त्यात अविश्वास प्रस्तावाचा उल्लेख आहे. पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी ज्या कारवाया सुरू आहेत त्यामागे अमेरिकेचा हात आहे. इम्रान खान यांच्या या आरोपवर आता अमेरिकेने उत्तर दिले आहे.
इम्रान खान यांच्या आरोपावर अमेरिकेकडून उत्तर देण्यात आले आहे. इम्रान खान यांनी अमेरिकेवर केलेल्या कोणत्याही आरोपात तथ्य नसल्याचे अमेरिकन प्रवक्त्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. आम्ही पाकिस्तानच्या घटनात्मक व्यवस्थेचा आणि प्रशासनाचा आदर करतो. पाकिस्तानमधील घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे अमेरिकेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
काय म्हणाले इम्रान खान?
इम्रान खान यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी आपल्या संबोधनाच्या मध्यभागी अमेरिकेचे नाव घेत इम्रान खान यांनी अमेरिकेतून धमकीचे पत्र आल्याचा दावा केला. ते पत्र माझ्या विरोधात होते, पत्रात अविश्वास प्रस्तावाबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणाले. इम्रान खान पंतप्रधान राहिले तर तुमचे इतर देशासोबतचे संबंध बिघडतील, असे या पत्रात म्हटले आहे. इम्रान खान पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यास अमेरिकेकडून पाकिस्तानला माफ करण्यात येईल, असे या पत्रात म्हटले होते, असे सांगत आल्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप इम्राण खांनी यांनी केला आहे. इम्रान खान सत्तेत असतील तर पाकिस्तानला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांना या संबंधीचे कागदपत्रे हाती लागली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
इम्रान खान म्हणाले की, "सध्या पाकिस्तान एका वेगळ्याच संकटातून जात असून पाकिस्तानचे नाव खराब होत आहे. अमेरिकेच्या नादाला लागून युद्धात भाग घेतल्याने पाकिस्तानची फरफट झाली. ज्यांच्यासोबत आपण लढलो, त्यांनीच आपल्यावर निर्बंध लावले. पाकिस्तानने दिलेल्या कुर्बानीबद्दल कुणी आभार मानले का? पाकिस्तानवर ड्रोन हल्ले करण्यात आले, त्यावर कुणी काही बोललं का? आता पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी अमेरिका काम करत आहे. पण मी झुकणार नाही आणि जनतेला झुकू देणार नाही."
महत्वाच्या बातम्या