एक्स्प्लोर

अमेरिकेत पुन्हा गोळीबार; टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी

Texas Mall Shooting: टेक्सास येथे झालेल्या  गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Texas Mall Shooting:  अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. टेक्सासमधील (Texas Mall Shooting)  डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये एक बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून  गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला.हल्लेखोर ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडली की पोलिसांनी प्रत्युत्तरात  (America News) केलेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टेक्सास येथे झालेल्या  गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेक्सासच्या मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी, 7 मे रोजी टेक्सास प्रांतातील डॅलसजवळील अॅलन शहरातील एका मॉलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक पोहोचले आणि पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला. नंतर तेथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, तो मृतदेह हल्लेखोराचा असल्याचे सांगण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, त्याने मॉलमध्ये अचानक गोळीबाराचा आवाज ऐकला आणि अनेक लोक मॉलमधून बाहेर पळताना पाहिले.

 

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हल्लेखोर मृतावस्थेत पडलेला दिसत आहे. त्याचे वय अंदाजे 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेतील बंदूक संस्कृती मोठी समस्या 

अमेरिकेसाठी बंदूक संस्कृती ही मोठी समस्या बनली आहे. 2021 मध्ये जवळपास 49 हजार लोकांनी गोळीबारात आपला जीव गमावला. त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. देशात लोकसंख्येपेक्षा जास्त शस्त्रं आहेत. तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीकडे किमान एक बंदूक असते आणि दोनपैकी जवळपास एक प्रौढ व्यक्ती बंदूक असलेल्या घरात राहतो.

गोळीबाराच्या घटना वाढत्या... 

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि गोळीबार हे समीकरण झालं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच, 2022 मध्ये अमेरिकत गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटना हॉस्पिटल, पब, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहेत. अमेरिकेसाठी तेथील बंदूक संस्कृती ही दिवसागणिक मोठी समस्या होत चालली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशात शस्त्रास्त्रांबाबत कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: व्यक्त केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget