एक्स्प्लोर

Alcohol vs Cancer: दारूचा एक थेंबही आरोग्यासाठी घातकच, WHO चा इशारा

 लॅन्सेटमधील संशोधनानुसार, आठवड्याला दीड लीटरपेक्षा कमी वाईन (wine), साडेतीन लीटरपेक्षा कमी बीअर (beer) किंवा 450 मिलीपेक्षा कमी दारु (spirits) पिणाऱ्यांना कॅन्सरचं निदान झालं आहे.

Alcohol vs Cancer: दारु (Alcohol)  किती प्रमाणात प्यायली तर तब्येतीला चांगली! हा सर्वच दारुच्या दुष्परिणामाविषयी काळजी करणाऱ्यांचा हा नेहमीचा प्रश्न. जवळपास कित्येक डॉक्टरांना हा प्रश्न दररोज विचारला जातो. तर आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने (WHO) या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. उत्तर म्हणजे डब्ल्यूएचओने थेट इशाराच जारी केला आहे. म्हणजे कितीही कमी प्रमाणात दारु प्यायली तरी ती घातकच.. फक्त घातक नाही तर आतड्याच्या कर्करोगाला आयतं निमंत्रण आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातल्या मद्यशौकिनांना दिलाय. असं म्हणतात की, एकच प्याला हा कधीच एक असत नाही, तर तो प्याला ओठाला लावण्यापूर्वीचा निर्णय हा एकच प्याला थांबवण्याचा निश्चय असतो. 

लॅन्सेट (The Lancet Public Health) या जगभरातील आरोग्य विषयक संशोधन प्रकाशित करणाऱ्या नियतकालिकात दारु आणि  कॅन्सरविषयीचं संशोधन प्रकाशित करण्यात आलंय. दारु अगदी किचिंत म्हणजे टोपणभर सुद्धा पिणं योग्य नसल्याचा इशारा लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात डब्ल्यूएचओने दिला आहे. लन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार दारुमुळे सात वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक असते. दारुचं अतिशय माफक किंवा अत्यंत कमी प्रमाणातील सेवनही कर्करोगाला आमंत्रण ठरतं असा इशाराच लन्सेटने दिला आहे. म्हणजे योग्य प्रमाणात दारु पिण्याचा कोणताच दावा सुरक्षित नसल्याचा दावा डब्ल्यूएचओने केला आहे. 

दारु पिणाऱ्या किंवा न पिणाऱ्यांमध्येही एक सार्वत्रिक गैरसमज असतो की, वाईनचा एक ग्लास किंवा बियरचा एक पिन्ट म्हणजे माफक प्रमाणात पिणं. पण डब्ल्यूएचओच्या मते या प्रकारचं कोणतंही पेय (beverage) सुरक्षित नाही. दारुमुळे ज्या सात प्रकारचा कर्करोग होण्याची सर्वाधिक शक्यता असते, त्यात सर्वाधिक धोका पुरुषांमध्ये आतड्याच्या आणि  महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचा असतो. तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात दारु पित तितक्या जास्त प्रमाणात या कॅन्सरची शक्यता बळावते. असं असलं तरी युरोपमधील अगदी अलीकडच्या आकडेवारीनुसार कॅन्सरचं निदान झालेल्यांमध्ये अतिशय कमी किंवा माफक प्रमाणात मद्यसेवन करणाऱ्याचांही सहभाग आहे.

 लॅन्सेटमधील संशोधनानुसार, आठवड्याला दीड लीटरपेक्षा कमी वाईन (wine), साडेतीन लीटरपेक्षा कमी बीअर (beer) किंवा 450 मिलीपेक्षा कमी दारु (spirits) पिणाऱ्यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. महिलांमधील माफक प्रमाणात दारु पिण्यामुळे तिथल्या महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग आढळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. युरोपमधील देशांमध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव होण्यासाठी तेथील मद्यसेवन सर्वाधिक कारणीभूत असल्याचा दावा लन्सेटमधील संशोधनात करण्यात आला आहे. युरोपीय संघातील देशांमध्ये कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणाही सर्वाधिक आहे.  

कॅन्सरचा धोका दारुच्या पहिल्या थेंबापासून 

दारु सेवन सुरु केल्यापासून कॅन्सर होण्याची शक्यता नेमकी कधी निर्माण होते, याचा नेमका पुरावा अजून तरी आस्तित्वात नाही, असं लॅन्सेटमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या निवेदनात म्हटलं आहे. म्हणजे आजपासून दारु प्यायला सुरु केल्यापासून किती दिवसांत कॅन्सर होईल, असा ठोस दावा आतातरी कुणालाच करता येणार नाही. तसंच जगात आजच्या सारखेला असं कोणतंही संशोधन उपलब्ध नाही की ज्यामध्ये दारु सेवनाचं माफक किंवा योग्य प्रमाण म्हणजे सुरक्षित प्रमाण असं निश्चित सांगण्यात आलं आहे. माफक प्रमाणात दारु पिणं ह्रदयासाठी चांगलं असा एक गैरसमज नेहमीच केला जातो, त्याला हे उत्तर डब्ल्यू एचओने लॅन्सेटमधील निवेदनातून दिलंय. म्हणजेच कितीही कमी किंवा माफक प्रमाणात दारु पिली तरी त्याचा धोका नक्कीच आहे. दारुचे कोणतेच कसलेही आरोग्यविषयक फायदे असल्याचं संशोधन सध्या उपलब्ध नाही. 

डब्ल्यूएचओच्या युरोपमधील, दारु आणि अन्य अपायकारक अंमली पदार्थ विषयक तज्ञ आणि बिगर संसर्गजन्य रोगाच्या तज्ञ असलेल्या डॉ कॅरीना फरेरा बोर्जेस सांगतात, दारु पिण्याचं कोणतं प्रमाण सुरक्षित आहे, असा दावा कुणी करु शकत नाही. कुणी किती दारु प्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न.. जितकी जास्त दारु पिता अर्थातच तितका कॅन्सरचा धोका जास्त.. म्हणजेच तुम्ही जितकी कमी दारु प्याल तितकं ते आरोग्यास चागलं.. म्हणजेच दारुच्या पहिल्या थेंबापासूनच त्याचे दुष्परिणाम सुरु होतात. तरीही दारु किती पिली म्हणजे आरोग्यास चांगली असते असा छातीठोक दावा करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Embed widget