एक्स्प्लोर

Al Zawahiri Killed: अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार, बायडेन म्हणाले, "आता खरा न्याय झाला"

Al Zawahiri Killed: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Al-Qaeda Leader Killed In US Drone Strike: अमेरिकेने (US) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, आता खरा न्याय मिळाला..
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. बीबीसीच्या वृत्तानुसार बायडेन म्हणाले की, "आता खरा न्याय मिळाला आहे आणि हा दहशतवादी मास्टरमाईंड आता जिवंत राहिलेला नाही," 

जवाहिरी आणि लादेन अमेरिकेवरील 9/11 हल्ल्याचे सूत्रधार
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रोनने दोन क्षेपणास्त्रे डागली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. ते म्हणाले की, कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी उपस्थित होते, परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही आणि फक्त जवाहिरी मारला गेला. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले. तो आणि लादेन हे अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याचे सूत्रधार होते. जवाहिरी हा अमेरिकेच्या ‘मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट’पैकी एक होता.

तालिबानने काय म्हटले?
तालिबानच्या प्रवक्त्याने अमेरिकेच्या या कारवाईला आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे उल्लंघन म्हटले आहे. "अशा कारवाया म्हणजे गेल्या 20 वर्षांच्या अयशस्वी अनुभवांची पुनरावृत्ती आहे आणि ती युनायटेड स्टेट्स, अफगाणिस्तान आणि क्षेत्राच्या हिताच्या विरोधात आहे," असे सांगितले.

अमेरिकेच्या हल्ल्यामागे जवाहिरीचा हात
इजिप्तच्या इस्लामिक जिहाद दहशतवादी गटाची स्थापना करण्यात मदत करणारे नेत्रचिकित्सक (Eye Surgeon) जवाहिरीने मे 2011 मध्ये लादेनला अमेरिकन सैन्याने मारल्यानंतर अल-कायदाचे नेतृत्व हाती घेतले. याआधी, जवाहिरीला अनेकदा बिन लादेनचा उजवा हात आणि अल-कायदाचा मुख्य विचारवंत म्हटले जायचे. 11 सप्टेंबर 2001 रोजी युनायटेड स्टेट्समध्ये झालेल्या हल्ल्यामागे त्याचा "ऑपरेशनल मेंदू" होता असे काही तज्ञांचे मत आहे.

लादेनचा राईट हॅंड
1980 च्या दशकात तुरुंगात असलेल्या जवाहिरीने त्याच्या सुटकेनंतर देश सोडला आणि हिंसक आंतरराष्ट्रीय जिहादी चळवळींमध्ये सामील झाला. अखेर तो अफगाणिस्तानात स्थायिक झाला, यावेळी तो ओसामा बिन लादेनबरोबर दहशतवादी संघटनेत सामील झाला. त्यांनी एकत्रितपणे अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले आणि 11 सप्टेंबर 2001 रोजी हल्ले केले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asim Munir On India: पाकिस्तान लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पुन्हा वल्गना; भारताला थेट धमकी देत म्हणाले, 'आता परिणाम गंभीर असतील...'
पाकिस्तान लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पुन्हा वल्गना; भारताला थेट धमकी देत म्हणाले, 'आता परिणाम गंभीर असतील...'
Mojtaba Khamenei: निर्णायक टप्प्यावर सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी ‘नॉट रिचेबल’; इराणमध्ये खळबळ, नेमकं काय घडतंय?
निर्णायक टप्प्यावर सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी ‘नॉट रिचेबल’; इराणमध्ये खळबळ, नेमकं काय घडतंय?
Shailendra Deolankar On Narendra Modi: सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर
सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Embed widget