सोव्हिएत कोसळल्यानंतर पुतीन यांच्यावर ओढावली होती 'ही' वेळ!
Vladimir Putin : सोव्हिएतच्या विघटनानंतर उदरनिर्वाहासाठी टॅक्सी चालवण्याची वेळ रशियाच्या प्रमुख गुप्तहेरावर आली होती.
Vladimir Putin : सोव्हिएत युनियन रशियाचे विघटन झाल्यानंतर रशियाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यावेळी अनेक रशियन नागरिकांनी या आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी बरेच प्रयत्न केले. याला रशियाचे तत्कालीन प्रमुख गुप्तहेर आणि विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीनही अपवाद ठरले नाही. सोव्हिएतच्या विघटनानंतर रशियात टॅक्सी चालवली होती असे पुतीन यांनी म्हटले.
तीन दशकांपूर्वी झालेले सोव्हिएतचे विघटन हे अनेक रशियन नागरिकांसाठी शोकांतिका असल्याचे पुतीन यांनी म्हटले. रशियातील सरकारी वृत्तसंस्था RIA नोवोस्ती यांनी हे वृत्त दिले आहे. एका प्रसारमाध्यम वाहिनीने रशियाबाबत एक माहितीपट तयार केला आहे. त्यामध्ये पुतीन यांनी ही बाब सांगितली आहे.
"शेवटी, सोव्हिएत युनियनचे पतन म्हणजे काय? हे सोव्हिएत युनियनच्या नावाखाली ऐतिहासिक रशियाचे पतन आहे," असे पुतीन यांनी या माहितीपटात म्हटले. सोव्हिएतच्या विघटनानंतर खचून गेलो होतो असेही पुतीन यांनी म्हटले. ही घटना म्हणजे 20 व्या शतकातील मोठी भू-राजकीय आपत्ती होती असेही पुतीन यांनी म्हटले.
पुतीन यांनी म्हटले की, सोव्हिएतच्या विघटनानंतर खर्चासाठी अतिरिक्त पैशांची आवश्यकता भासत होती. त्यावेळी मी टॅक्सी चालवून उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न केला. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट निर्माण झाले. अनेकजण गरिबीच्या खाईत लोटले गेले. सोव्हिएतच्या विघटनाचे जागतिक राजकारणावरही परिणाम झाले होते. सोव्हिएत युनियन रशियाच्या विघटनानंतर रशिया व इतर 15 देश स्वतंत्र झाले. त्याशिवाय काही दशके सुरू असलेल्या शीतयुद्धाचीही अखेर झाली होती. साम्यवादी विचारांचे सरकार असलेल्या देशांमध्येही या घटनेचे पडसाद उमटले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Tablighi Jamaat: सौदी अरेबियात तबलिगी जमातीवर बंदी, सरकारने म्हटले....
- Pakistan Mob lynching Case : पाकिस्तानातील श्रीलंकन नागरिक हत्याकांड प्रकरण, 800 जणांवर गुन्हा दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha