एक्स्प्लोर
आयसिस-तालिबानविरोधात 45 अफगाणी महिलांचा सशस्त्र लढा
काबुल : अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील जावजान प्रांतात तालिबान आणि इस्लामिक स्टेट (आयसिस) या दोन दहशतवादी संघटनांविरोधात काही अफगाणी महिलांनी शस्त्र हाती घेतले आहेत. खामा प्रेस या वृत्तसंस्थेनी याबाबत माहिती दिली.
तालिबान आणि आयसिसने जगभरातील अनेक देशांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आयसिसने अनेक निरपराधांच्या क्रूररित्या हत्या केल्या. या दहशतवादी संघटनांविरोधात आता अफगाणी महिलांनीच लढा सुरु केला आहे.
अफागाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात दहशतवाद्यांचं जाळं पसरु नये म्हणून या महिलांनीच पुढाकार घेऊन एक संघटना तयार केली आहे.
अफगाणिस्तानसह जगभरातील लोकांनी या महिलांच्या धडासला सलाम केला आहे आणि त्यांच्या लढ्यासाठी प्रोत्साहनही दिलं आहे. दहशतवाद्यांविरोधात शस्त्र हाती घेणाऱ्या या महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, महिलांच्या हातात असॉल्ट रायफल्स दिसत आहेत.
https://twitter.com/Edrisbeigi/status/815802888232534017
आयसिस आणि तालिबानविरोधातील अफगाणी महिलांची मोहीम गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दरजाब जिल्ह्यातून सुरु झाली. दरजाब जिल्ह्यात तालिबान्यांचं जाळं पसरण्यापासून रोखण्यासाठी महिला कमांडरनी पुढाकार घेत लढा सुरु केला आहे. या अफगाणी महिलांचं नेतृत्त्व 53 वर्षीय जरमिना या करत असून, यात 45 महिलांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement